AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Twinkle Khanna: रावण हा ओरिजिनल टेक ब्रो.. ‘रामायण’ पाहिल्यानंतर ट्विंकल खन्नाची भन्नाट तुलना, नेमकं काय म्हणाली?

Twinkle Khanna: बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाने लिहिलेल्या एका लेखातच रामायण या चित्रपटातील रावणाला "ओरिजिनल टेक ब्रो" असे म्हटले आहे. आती ती नेमकं काय म्हणाली वाचा...

Twinkle Khanna: रावण हा ओरिजिनल टेक ब्रो.. 'रामायण' पाहिल्यानंतर ट्विंकल खन्नाची भन्नाट तुलना, नेमकं काय म्हणाली?
Twinkle KhannaImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 17, 2026 | 8:53 AM
Share

अभिनेत्री ते लेखिका असा प्रवास केलेल्या ट्विंकल खन्नाने महाकाव्य ‘रामायण’मधील रावण आणि जगातील काही सर्वात शक्तिशाली टेक अब्जाधीशांची तुलना केली आहे. ज्यात जेन्सन हुआंग, इलॉन मस्क आणि बिल गेट्स यांचा समावेश आहे. ट्विंकल खन्नाने त्यांच्यात एक रंजक तुलना केली आहे. या राक्षस राजाचे वर्णन “ओरिजिनल टेक ब्रो (ब्लूप्रिंट)” असे करत ट्विंकलने त्याची बुद्धिमत्ता, संपत्ती, तांत्रिक क्षमता आणि आपण नियमांपेक्षा मोठे आहोत ही त्याची विचारसरणी यातील साम्य अधोरेखित केले आहे.

एका प्रसिद्ध वर्तमानपत्राच्या स्तंभामध्ये ट्विंकलने नितेश तिवारी दिग्दर्शित आगामी दोन भागांचा चित्रपट ‘रामायण: राइज ऑफ अ लेजेंड’मधील रावणाच्या भूमिकेवर भाष्य केले आहे. या खलनायकाची असामान्य बुद्धिमत्ता आणि शक्ती यांची आजच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तींशी कशी तुलना केली जाऊ शकते, हे तिने सांगितले आहे.

ट्विंकल खन्नाने चित्रपटातील मुख्य अभिनेता रणबीर कपूरची इलॉन मस्कच्या ‘टेस्ला रोडस्टर’ची तुलना रावणाच्या पौराणिक उडत्या रथाशी म्हणजेच ‘पुष्पक विमाना’शी केल्यानंतर निरीक्षण नोंदवले आहे. हाच संदर्भ पुढे नेत ट्विंकलने रावणाचे यश आणि स्वतःच्या इच्छांवर नियंत्रण ठेवण्यातील त्याचे अपयश आधुनिक जगातील काही शक्तिशाली पुरुषांच्या वागणुकीचे कसे प्रतिबिंब दर्शवते, याचे विश्लेषण केले आहे.

आपला दृष्टिकोन मांडताना तिने लिहिले आहे की, “रावण अत्यंत विद्वान, श्रीमंत, शक्तिशाली होता आणि त्याच्याकडे उल्लेखनीय तंत्रज्ञान उपलब्ध होते. इतरांना लागू होणाऱ्या नियमांपेक्षा आपण वरचढ आहोत, असेही त्याला वाटत असे. यामध्ये अमरत्वाचा ध्यास जोडला, तर त्याच्यातील आणि आजच्या टेक अब्जाधीशांमधील साम्य दुर्लक्षित करणे कठीण आहे.”

रावण आजच्या तंत्रज्ञान विश्वात किती सहजपणे मिसळून गेला असता, ज्यात त्याचे स्वतःचे पॉडकास्ट आणि सिलिकॉन व्हॅलीमध्ये मुख्यालय असते, याचीही कल्पना ट्विंकलने केली आहे. तिने पुढे म्हटले आहे की, “रावणाला फक्त एक लेदर जॅकेट, त्याच्या दहाही डोक्यांवर एक-एक गॅझेट (डिव्हाइस) आणि स्वतःच्या पॉडकास्टसह सिलिकॉन व्हॅलीमध्ये एक मुख्यालय हवे आहे, आणि तो तिथे अगदी सहज मिसळून जाईल. रावणाकडे जग जिंकण्याची बुद्धिमत्ता आणि क्षमता होती, परंतु अनेक शक्तिशाली पुरुषांप्रमाणेच तो स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरला.”

तिच्या या तुलनेत बिल गेट्स यांच्यासह इतर प्रभावशाली व्यावसायिक व्यक्तींभोवती असलेल्या वादांचा आणि टीकेचाही संदर्भ आहे. अफाट संपत्ती, बुद्धिमत्ता आणि तांत्रिक प्रगती म्हणजे व्यक्तीच्या वैयक्तिक निवडींवर नियंत्रण असणे नव्हे, हा तिच्या लेखाचा मुख्य गाभा होता.

दरम्यान, ‘रामायण: राइज ऑफ अ लेजेंड’ हा नमित मल्होत्रा निर्मित भारतीय महाकाव्यावर आधारित दोन भागांचा चित्रपट आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत, साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत, रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. निर्मात्यांनी या चित्रपटातील एक पोस्ट-क्रेडिट सीन आणि ‘हनुमान चालीसा’ असलेला एक म्युझिक व्हिडिओ देखील प्रदर्शित केला आहे. या भक्तिगीतात सनी देओलची भगवान हनुमानाच्या रूपातील झलक पाहायला मिळते.

Follow Us
बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन; ठाकरे बंधू एकत्र दिसणार?
Balasaheb Thackeray Smrutidin : बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन; ठाकरे बंधू एकत्र दिसणार?
इंदुरीकर महाराज याचं पुन्हा मुली आणि नात्यांबाबत वादग्रस्त विधान!
इंदुरीकर महाराज याचं पुन्हा मुली आणि नात्यांबाबत वादग्रस्त विधान! म्हणाले, 'मुली कधीच प्रेम नाही...
ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती! अगामी बैठकीत ऊस दराचा...
ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती! अगामी बैठकीत ऊस दराचा फैसला
एक बिहारी, सब पे भारी! शिंदे गटातील नेत्याच्या विधानाची राज्यभर चर्चा
एक बिहारी, सब पे भारी!' शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी; राजकीय, सामाजिक आणि महत्त्वाच्या अपडेट्
News Headline : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी; राजकीय, सामाजिक आणि महत्त्वाच्या अपडेट्स...
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
Rohit Pawar : 'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक