AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑनलाइन वस्तू खरेदी करताय? सावधान! एका चुकीने होईल हजारो रुपयांचं नुकसान

ऑनलाइन वस्तू खरेदी करणाऱ्यांनी महत्वाची बातमी हाती आली आहे. तुमच्या एका चुकीने होईल हजारो रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन वस्तू खरेदी करताय? सावधान! एका चुकीने होईल हजारो रुपयांचं नुकसान
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 17, 2026 | 8:50 AM
Share

मुंबई असो अकोला…देशातील सर्वच भागात ऑनलाइन वस्तू खरेदी वाढू लागली आहे. वाढत्या ऑनलाइन शॉपिंगमुळे स्कॅमर्सच्या नजरा वळल्या आहेत. स्कॅमर्सने आता इमेल आयडी हॅक करायला सुरुवात केली आहे. ऑनलाइन शॉपिंगच्या नावाखाली ग्राहकांच्या घराच्या पत्त्यावर बोगस वस्तू पाठवल्या जाताहेत.   त्यानंतर ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी कुरिअर बॉय तगादा लावताना दिसताहेत. इतकेच नव्हे, तर घरी पार्सलमध्ये वस्तू देखील निकृष्ट दर्जाच्या आल्या आहेत. अकोला जिल्ह्यात हा संपूर्ण प्रकार घडला आहे.

अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातील नरेश नालट या व्यक्तीसोबत असाच ऑनलाइन स्कॅम झाल्याचे उघड झालं आहे. घर आलेलं पार्सल घेतल्यानंतर ऑनलाइन पेमेंट केलं. पण ऑनलाइन शॉपिंगमध्ये आलेला पॅन्ट हा फाटलेला आणि निकृष्ट दर्जेचा होता. ऑनलाइन वस्तू घेतल्यानंतर वस्तूची रिटर्न रिक्वेस्ट टाकण्याचा प्रयत्न केल असता. परंतु पार्सल बोलावलंच नसल्याचे लक्षात आलं. अशाप्रकारे घराच्या पत्त्यावर स्कॅमर्स बोगस ऑनलाइन वस्तू पाठवून ग्राहकांकडून पैसे उकळत असल्याचे समोर आलं आहे. तर या प्रकरणात अकोला पोलिसांच्या सायबर सेलमध्ये ही तक्रार प्राप्त झाली आहे. या तक्रारीनंतर ग्राहकांना महत्वाचं आवाहन करण्यात आलं हे. या बोगस स्कॅमर्स पासून दूर राहावे, असं आवाहन सायबर सेलकडून करण्यात आलं आहे.

ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी करताना काय काळजी घ्यावी?

ग्राहकांनी विश्वसनीय साइट्सवरून खरेदी करावी. अज्ञात लिंक्सवर क्लिक करू नये. तसेच एखाद्या साइटवरून जर तुम्ही पहिल्यांदा खरेदी करित असाल, तर कॅश ऑन डिलेव्हरीचा पर्याय निवडावा. घरी डिलिव्हरी झालेला पार्सलचा आयडी आणि बुकिंग आयडी खात्री करूनच स्वीकारा. ऑनलाइन पेमेंट करत असाल तर कंपनीच्या नावाने पेमेंट होत आहे का? तपासावं, अशा सूचना सायबर सेलने केल्या आहेत.  तसेच तुमच्या घराच्या पत्त्यावर अनोळखी व्यक्तीने पार्सल पाठवलं असेल, तर ते स्वीकारू नये. तुम्हाला पार्सल कोणी पाठवलं असेल, त्याची माहिती जाणून घ्यावी. जेणेकरून तुम्हाला आर्थिक नुकसान टाळता येईल.

Follow Us
इंदुरीकर महाराज याचं पुन्हा मुली आणि नात्यांबाबत वादग्रस्त विधान!
इंदुरीकर महाराज याचं पुन्हा मुली आणि नात्यांबाबत वादग्रस्त विधान! म्हणाले, 'मुली कधीच प्रेम नाही...
ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती! अगामी बैठकीत ऊस दराचा...
ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती! अगामी बैठकीत ऊस दराचा फैसला
एक बिहारी, सब पे भारी! शिंदे गटातील नेत्याच्या विधानाची राज्यभर चर्चा
एक बिहारी, सब पे भारी!' शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी; राजकीय, सामाजिक आणि महत्त्वाच्या अपडेट्
News Headline : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी; राजकीय, सामाजिक आणि महत्त्वाच्या अपडेट्स...
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
Rohit Pawar : 'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...