AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगाव जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी घडामोडींना वेग, थेट सुप्रिया सुळे यांचा महाजनांना फोन, आज..

Jalgaon District Central Cooperative Bank Elections 2026: जिल्हा बँक निवडणुकीत आतापर्यंत शिवसेना शिंदे गटाच्या दोन भाजपची एक व राष्ट्रवादी अजित पवार गटाची एक जागा बिनविरोध झाली आहे, आज माघारीचा अंतिम दिवस आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात दोघेही भाजपचे उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावा याबद्दलच्या सूचना गिरीश महाजन यांनी केले आहे. त्यातच मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

जळगाव जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी घडामोडींना वेग, थेट सुप्रिया सुळे यांचा महाजनांना फोन, आज..
Jalgaon District Bank Election
| Updated on: Nov 17, 2026 | 8:53 AM
Share

किशोर पाटील, जळगाव : जळगाव जिल्हा बँकेची रणधुमाळी सुरू आहे. माघारीचा दिवस येऊन ठेपला. मात्र अद्याप या निवडणुकीत महायुतीचा जागांचा तिढा सुटलेला नाही, दुसरीकडे महाविकास आघाडीला एक जागा देऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी देखील नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी थेट सुप्रिया सुळे यांचा महायुतीचे नेते गिरीश महाजन यांना फोन आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मुक्ताईनगर आणि चोपडा या ठिकाणी भाजप व शिवसेना शिंदे गट आमने-सामने असून याच जागांवरून तिढा कायम आहे, आतापर्यंत महायुतीच्या जवळपास नेत्यांच्या पाच बैठका पार पडूनही तिढा सुटलेला नाही, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला एक जागा देऊन इतर सर्व ठिकाणी त्यांच्या उमेदवारांनी माघार घेण्याबाबतचा प्रस्ताव आला आहे. यासाठी थेट शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचा मंत्री गिरीश महाजन यांना फोन आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी देखील नेत्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू असून काल रात्री उशिरापर्यंत अजिंठा विश्रामगृहात या संदर्भात खलबते सुरू होती.

गिरीश महाजन यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

जिल्हा बँक निवडणुकीत आतापर्यंत शिवसेना शिंदे गटाच्या दोन भाजपची एक व राष्ट्रवादी अजित पवार गटाची एक जागा बिनविरोध झाली आहे, आज माघारीचा अंतिम दिवस आहे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात दोघेही भाजपचे उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावा याबद्दलच्या सूचना गिरीश महाजन यांनी केले आहे. त्यामुळे त्यांची देखील जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात त्यांच्याच कार्यकर्त्यांचा अर्ज असल्याने कार्यकर्त्याच्या माघारी नंतर मंत्री गिरीश महाजन यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे, आज माघारी तर शेवटचा दिवस असल्याने सहा ते सात जागा बिनविरोध होण्याची शक्यता मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील हे देखील बिनविरोध होण्याची शक्यता

शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील यांचा अर्ज जिल्हा बँक निवडणुकीत बाद ठरविण्यात आला होता. यानंतर सुमित पाटील यांनी प्रचंड संताप व्यक्त करत थेट सत्ताधाऱ्यांच्या दबावातून अर्ज बाद झाल्याचा आरोप केला होता अदृश्य शक्ती कोण असा सवाल देखील उपस्थित केला होता, त्यानंतर सुमित पाटील यांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील केल्यानंतर त्यांचा अर्ज वैध ठरला आहे. आता सुमित पाटील यांच्या विरोधात असलेला भाजपचे उमेदवार माघार घेऊन सुमित पाटील यांना बिनविरोध करण्याचे देखील हालचाली सुरू आहेत, मंत्री गिरीश महाजन यांनी काल पत्रकारांशी बोलताना तशी संकेत दिली असून जागा बिनविरोध झाली तर अदृश्य शक्ती कामाला आली असं समजायचं असं सूचक वक्तव्य देखील आमदार किशोर पाटील यांनी केला आहे त्यामुळे सुमित पाटील यांच्या बिनविरोध निवडीकडे देखील लक्ष लागला आहे

भाजपच्या मंत्री रक्षा खडसे यांच्याविरुद्ध मुक्ताईनगरच्या जागेवर शिंदे गटाच्या आमदाराची आक्रमक भूमिका

जिल्हा बँक निवडणुकीत सुरुवातीपासूनच मुक्ताईनगर येथील भाजपच्या मंत्री खडसे यांच्याविरुद्ध शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा अर्ज आल्याने चुरस पाहायला मिळत आहे, विशेष म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोघांकडून एकमेकांचे अर्ज बाद व्हावेत यासाठी हरकती देखील घेण्यात आल्या मंत्री रक्षा खडसे यांनी तर थेट उच्च न्यायालयात शिंदे गटाच्या उमेदवारांच्या उमेदवारीवर आव्हान उपस्थित करत मतदान घेऊ नये अशी याचिका दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्याने शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे, आपल्याला ही जागा लढायचीच असून ही जागा मला मिळालीच पाहिजे अशी आग्रही भूमिका शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटलांनी कालच्या बैठकीत गिरीश महाजन गुलाबराव पाटील यांच्यासमोर मांडली. आता या ठिकाणी नेमकं शिवसेना शिंदे गटाची माघार होते का की भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत होते, हे पाहणं महत्त्वाचा असणार आहे. दुसरीकडे चोपडा देखील भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट आमने-सामने असून यादेखील जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही..

महायुती 100% फिक्स सर्व जागा महायुती जिंकणार : मंत्री गिरीश महाजन यांचा विश्वास

दोन जागांचा तिढा वगळता जिल्हा बँकेची निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाईल याबद्दलचा निर्णय झाला असून निवडणुकीत सर्व जागा महायुतीच जिंकेल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. महायुती झाल्याचा निर्णय झाल्यावर महायुतीतील असलेल्या पक्षाचे एकमेकांचे विरुद्ध असलेले अर्ज मागे घेतले जातील. एक जागा द्यावी त्या बदल्यात इतर सर्व ठिकाणी आमचे उमेदवार माघार घेतील असा प्रस्ताव देखील महाविकास आघाडी कडून आल्याचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले. यासंदर्भात शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील व शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष कुलभूषण पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांची भेट देखील घेतली. याच संदर्भात शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचा देखील फोन आल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. निवडणूक बिनविरोध करावी या संदर्भात रात्री उशिरापर्यंत अजिंठा विश्रामगृहात खलबते सुरू होते तर अनेकांच्या माघारी साठी देखील शर्तीचे प्रयत्न आमदारांकडून केले जात आहेत. आज माघारीचा अंतिम दिवस असून माघारी नंतर निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे, आता निवडणूक बिनविरोध होते का? काही ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा सामना रंगतो का? महाविकास आघाडीचे उमेदवार माघार घेतील का? या सर्व प्रश्नांची उत्तर सध्यातरी अनुत्तरीत असून आज दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडतात याकडे लक्ष लागला आहे. निवडणुकीसाठी २९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच दिग्गज नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे

Follow Us
बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन; ठाकरे बंधू एकत्र दिसणार?
Balasaheb Thackeray Smrutidin : बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन; ठाकरे बंधू एकत्र दिसणार?
इंदुरीकर महाराज याचं पुन्हा मुली आणि नात्यांबाबत वादग्रस्त विधान!
इंदुरीकर महाराज याचं पुन्हा मुली आणि नात्यांबाबत वादग्रस्त विधान! म्हणाले, 'मुली कधीच प्रेम नाही...
ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती! अगामी बैठकीत ऊस दराचा...
ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती! अगामी बैठकीत ऊस दराचा फैसला
एक बिहारी, सब पे भारी! शिंदे गटातील नेत्याच्या विधानाची राज्यभर चर्चा
एक बिहारी, सब पे भारी!' शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी; राजकीय, सामाजिक आणि महत्त्वाच्या अपडेट्
News Headline : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी; राजकीय, सामाजिक आणि महत्त्वाच्या अपडेट्स...
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
Rohit Pawar : 'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक