
अनेक लोकांना वाटते की बिअर पिने शरीरासाठी चांगले असते. विशेष म्हणजे इतर मद्यांच्या तुलनेत बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी असते. त्यामुळेच अनेकजण बिअर प्यायलाने शरीरावर कोणताही वाईट परिणाम पडत नाही, असे वाटते. हाच दावा करून अनेकजण बिअर पिण्याचे समर्थन करतात. परंतु डॉक्टरांचे मत मात्र वेगळेच असते. त्यामुळेच बिअर पिणे चांगले असते का? सोबतच किती बिअर पिणे सुरक्षित मानले जाते, हे जाणून घेऊ या...

काही लोक रोज बिअरच्या एक किंवा दोन बॉटल पितात. काही लोकांना तर यापेक्षाही जास्त बिअर हवी असते. एकदा बिअर पिणे सुरु केल्यावर नंतर या मद्याची सवय लागते आणि या मद्यापासून दूर होणे अशक्य होऊन बसते. त्यामुळे वेळीच योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

डॉक्टरांच्या मतानुसार शरीरात जेव्हा अल्कोहोल जाते तेव्हा त्या अक्लोहोलला आपले यकृत एका प्रकारे गाळून घेते. या प्रक्रयेत यकृताच्या काही पेशी खराब होतात. परंतु कालांतराने या पेशी पुन्हा तयार होतात. परंतु तुम्ही रोजच बिअर किंवा अन्य मद्याचे प्राशन केल्यास यकृत पेशींची पुनर्निमीती करू शकत नाही. त्यामुळे कालांतराने यकृत निकामी होऊन जाते.

अन्य मद्यांच्या तुलनेत बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी असते. परंतु बिअरमध्ये असलेले अल्कोहोलदेखील शरीरासाठी चांगले नसते. ज्या लोकांना यकृताशी संबंधित काही अडचणी असतील तर त्यांनी चुकूनही बिअरचे प्राशन करू नये. सोबतच ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास असतो, त्यांनीही कधीच बिअर पिऊ नये.

जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार अल्कोहोलचा एक थेंबदेखील शरीसासाठी घातक असतो. म्हणूनच बिअर पिणे शरीरासाठी चांगली असते, हा तर्क चुकीचा आहे. अक्लोहोलमुळे कर्करोगही होऊ शकतो. त्यामुळेच बिअर आणि अन्य कोणतेही मद्य प्राशन करणे शरीरासाठी घातकच असते.