नवीन लग्न झाल्यामुळे पत्नीसाठी असं काही केलं की आता थेट रवानगी जेलमध्ये!

नवीन लग्न झाल्यामुळे पत्नीला खुश करण्यासाठी पठ्ठ्याने असं काही केलं की त्याला आता जेलमध्ये हवा खाण्याची वेळ आली आहे.

Dec 31, 2020 | 5:47 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Dec 31, 2020 | 5:47 PM

प्रेमात हल्ली कोण काय करेल याचा भरोसा नाही. असाच एक प्रकार पुण्यात समोर आला आहे. नवीन लग्न झाल्यामुळे पत्नीला खुश करण्यासाठी पठ्ठ्याने असं काही केलं की त्याला आता जेलमध्ये हवा खाण्याची वेळ आली आहे.

1 / 11
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन लग्न झाल्यानंतर पत्नीला खुश करण्यासाठी एका सराईताने रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या वाहनांतून साड्यांची चोरी केली.

2 / 11
सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे पत्नीला सांगताना मात्र मित्राचे साड्यांचे दुकान असल्याचे सांगत 30 हून अधिक साड्या गिफ्ट केल्या.

3 / 11
इतकंच नाही तर बायकोला खुश करण्यासाठी त्याने ड्रेसचीही चोरी केल्याचं समोर आलं आहे.

4 / 11
या सगळ्या प्रकारानंतर शहरातील विविध भागात घरफोडी आणि वाहनचोरी करणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनीट पाचने अटक केली.

5 / 11
रोहन बिरू सोनटक्के (वय 21, रा. वारजे माळवाडी) असं अटक केलेल्या सराईताचे नाव आहे.

6 / 11
रोहनकडून दोन मोटारी, एक दुचाकी, 18 मोबाईल, 3 लॅपटॉप, 30 साड्या, 12 ड्रेस मिळून 13 लाख 40 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

7 / 11
गुन्हे शाखेचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सराईत वाहनचोर मोबाइल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार महेश वाघमारे आणि प्रवीण काळभोर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून रोहनला ताब्यात घेतले.

8 / 11
चौकशीत त्याने शहरातील विविध भागात घरफोडी आणि वाहनचोरी केल्याची कबुली दिली. त्याशिवाय नवीनच लग्न झाल्यामुळे पत्नीला खूश करण्यासाठी तो चोरी करीत असल्याची कबुली दिली.

9 / 11
रस्त्याच्या कडेला वाहने थांबवून झोपलेल्या चालकाची नजर चुकवून कटावणीच्या साह्याने रोहन साड्यांची चोरी करीत होता. रोहन सराईत गुन्हेगार असून त्याने केलेले ९ गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.

10 / 11
ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंग  यांच्या मार्गदर्शनाखाली  सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे,  पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे यांच्या पथकाने केली.

11 / 11

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें