प्रेमात पडलेल्या तरुणांचं प्रचंड आवडतं गाणं, 32 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, एकदा ऐकलं की दिवसभर डोक्यातून जात नाही

प्रेमात पडलेल्या प्रत्येक व्यक्तीचं आवडतं गाणं, जे गेल्या 30 वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर करत आहे राज्य. एकदा ऐकलं तरी दिवसभर गुणगुणतात लोक.

| Updated on: Sep 01, 2026 | 1:57 PM
1 / 5
90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक अविस्मरणीय आणि सदाबहार गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली. असचं एक लोकप्रिय गाणं म्हणजे ‘एक लड़की को देखा’. तीन दशकांहून अधिक काळ लोटला तरी या गाण्याची लोकप्रियता आजही कायम आहे.

2 / 5
प्रेम व्यक्त करण्यासाठी आजही अनेक जण हे गाणं गुणगुणताना दिसतात. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘1942: ए लव्ह स्टोरी’ या चित्रपटातील हे गाणं गीतकार जावेद अख्तर यांच्या सुंदर शब्दांनी सजलं आहे.

3 / 5
विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘1942: ए लव्ह स्टोरी’ या चित्रपटाची कथा स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर आधारित होती. चित्रपटात देशभक्ती आणि क्रांतीसोबतच प्रेमकहाणीही प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.

4 / 5
अनिल कपूर यांनी नरेन सिंह, तर मनीषा कोईराला यांनी रज्जोची भूमिका साकारली. याशिवाय जॅकी श्रॉफ, अनुपम खेर, डॅनी डेंझोंगपा आणि प्राण यांच्या भूमिकांनीही चित्रपटाला बळ दिलं.

5 / 5
प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळालं नाही. मात्र, चित्रपटाच्या संगीताने इतिहास घडवला. विशेषतः ‘एक लड़की को देखा’ हे गाणं प्रचंड लोकप्रिय ठरलं आणि आजही भारतीय सिनेमातील रोमँटिक गाण्यांमध्ये त्याची गणना केली जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us