घराच्या कोणत्या कोपऱ्यात ड्रीम कॅचर लावावा? फक्त एक बदल अन् लगेच पालटेल तुमचे नशीब

घरामध्ये ड्रीम कॅचर लावल्याने केवळ सौंदर्यच वाढत नाही, तर नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते. ड्रीम कॅचर कोणत्या दिशेला लावावे, त्याचे फायदे आणि महत्त्वाचे नियम या लेखात सविस्तर जाणून घ्या.

| Updated on: May 14, 2026 | 2:22 PM
1 / 8
आजकल घराच्या सजावटीसाठी ड्रीम कॅचर (Dream Catcher) वापरण्याचा कल वाढला आहे. दिसायला अत्यंत आकर्षक असणारी ही वस्तू केवळ सौंदर्यासाठी नसून, वास्तू आणि फेंगशुई शास्त्रानुसार तिला विशेष महत्त्व आहे.

आजकल घराच्या सजावटीसाठी ड्रीम कॅचर (Dream Catcher) वापरण्याचा कल वाढला आहे. दिसायला अत्यंत आकर्षक असणारी ही वस्तू केवळ सौंदर्यासाठी नसून, वास्तू आणि फेंगशुई शास्त्रानुसार तिला विशेष महत्त्व आहे.

2 / 8

जर तुम्ही घरात योग्य पद्धतीने ड्रीम कॅचर लावला तर तो घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो. त्यामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होते. ड्रीम कॅचर हे झोपेत येणारी भीतीदायक किंवा वाईट स्वप्ने पकडण्याचे (Filter) काम करतो, ज्यामुळे तुम्हाला शांत झोप लागते.

3 / 8

घरातील वास्तू दोषांमुळे निर्माण होणारी नकारात्मकता दूर करून सकारात्मक लहरी वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो. केवळ घरातच नाही, तर कामाच्या ठिकाणी किंवा अभ्यासाच्या खोलीत ड्रीम कॅचर लावल्याने मानसिक शांतता मिळते आणि कामात लक्ष केंद्रित करणे सोपे जाते.

4 / 8

कोणतीही शुभ वस्तू चुकीच्या दिशेला लावल्यास तिचा पूर्ण लाभ मिळत नाही. ड्रीम कॅचर लावण्यासाठी उत्तर किंवा पूर्व दिशा योग्य मानली जाते. या दिशांना देव दिशा मानले जाते. येथे ड्रीम कॅचर लावल्याने घरात प्रगती आणि सकारात्मक ऊर्जा येते.

5 / 8

घराच्या ईशान्य कोपऱ्यात ड्रीम कॅचर लावणे अत्यंत शुभ फलदायी ठरते. जर तुम्हाला घरातील सदस्यांमधील नातेसंबंध अधिक दृढ करायचे असतील, तर नैऋत्य दिशेला ड्रीम कॅचर लावणे फायदेशीर ठरते.

6 / 8

झोपण्याच्या खोलीत खिडकीजवळ ड्रीम कॅचर लावणे सर्वात उत्तम. असे मानले जाते की खिडकीतून येणारी वाईट स्वप्ने यात अडकतात आणि सकाळी सूर्यप्रकाशाने ती नष्ट होतात. बाल्कनीमध्ये लावल्याने घराचे प्रवेशद्वार आणि मुख्य हॉलमधील वातावरण प्रसन्न राहते.

7 / 8

जर तुम्ही वर्क-फ्रॉम-होम करत असाल, तर उत्पादकता वाढवण्यासाठी अभ्यासाच्या टेबलाजवळ हे लावता येईल. मात्र स्वयंपाकघर आणि बाथरूम या ठिकाणी ड्रीम कॅचर लावू नये. ड्रीम कॅचर नेहमी अशा उंचीवर लावा जिथे ते मोकळे लटकू शकेल.

8 / 8

वारंवार लोकांचा स्पर्श होईल किंवा डोक्याला लागेल अशा ठिकाणी ते टांगू नका. लोक सतत ज्या खालून ये-जा करतात अशा मार्गावर लावणे टाळावे, कारण यामुळे ऊर्जेचा प्रवाह खंडित होऊ शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us