India vs Afghanistan : दिल्लीत टीम इंडियाला धक्का बसणार? अरुण जेटली स्टेडियमचे आकडे कोणाच्या बाजूने?

India vs Afghanistan T20 News : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अरुण जेटली स्टेडियमवर भारतीय संघाचा रेकॉर्ड कसा आहे?

| Updated on: Sep 13, 2026 | 6:00 PM
1 / 5
टी-20 वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ आणि अफगाणिस्तान यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार असून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

टी-20 वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ आणि अफगाणिस्तान यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार असून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

2 / 5

भारताने या मैदानावर खेळलेल्या 5 टी-20 सामन्यांपैकी 3 सामने जिंकले आहेत, तर 2 सामन्यांत बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला आहे.

3 / 5

येथील 14 टी-20 सामन्यांपैकी 9 वेळा प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे, तर केवळ 5 वेळा प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे.

4 / 5

2016 मध्ये या मैदानावर पहिला टी-20 (विरुद्ध इंग्लंड) खेळलेला अफगाणिस्तान संघ तब्बल 10 वर्षांनंतर येथे उतरणार आहे.

5 / 5

त्यामुळं भारत मजबूत दिसत असला, तरी या मैदानाचे संमिश्र रेकॉर्ड पाहता टीम इंडियाला सावधगिरीने खेळावे लागणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us