4 सिझन, 32 एपिसोड्स, 6 वर्षांपासून प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय; भारताची नंबर 1 सीरिज

गेल्या सहा वर्षांपासून ही वेब सीरिज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या सीरिजला आयएमडीबीवरही दहापैकी 9 इतकी उत्तम रेटिंग मिळाली आहे. आतापर्यंत या सीरिजचे एकूण चार सिझन्स प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

| Updated on: Aug 03, 2026 | 11:15 AM
1 / 5
सध्याच्या काळात ओटीटी हे मनोरंजनाचं प्रमुख साधन बनलंय. असे अनेक वेब सीरिज आणि चित्रपट आहेत जे ओटीटीवर सर्वांच्याच पसंतीस उतरतात. अशीच एक वेब सीरिज गेल्या सहा वर्षांपासून प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी ही सीरिज भारतातील सर्वांत लोकप्रिय वेब सीरिज आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

सध्याच्या काळात ओटीटी हे मनोरंजनाचं प्रमुख साधन बनलंय. असे अनेक वेब सीरिज आणि चित्रपट आहेत जे ओटीटीवर सर्वांच्याच पसंतीस उतरतात. अशीच एक वेब सीरिज गेल्या सहा वर्षांपासून प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी ही सीरिज भारतातील सर्वांत लोकप्रिय वेब सीरिज आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

2 / 5

विशेष म्हणजे या वेब सीरिजमध्ये कोणताही सस्पेन्स नाही किंवा कोणतीही मारहाण नाही. तरीसुद्धा प्रेक्षकांमध्ये ही प्रचंड लोकप्रिय आहे. या सीरिजचे आतापर्यंत एकूण चार सिझन्स प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चार सिझनमध्ये एकूण 32 एपिसोड्स आहेत. हे सर्व सिझन्स आणि एपिसोड्स हिट आहेत.

3 / 5

कॉमेडी जॉनरच्या या वेब सीरिजमध्ये कोणताच मोठा स्टार नाही, तरीसुद्धा ही भारतातील पहिल्या क्रमांकाची वेब सीरिज मानली जाते. या वेब सीरिजचं नाव आहे 'पंचायत'. यामध्ये जितेंद्र कुमार, रघुबीर यादव आणि नीना गुप्ता यांसारखे कलाकार आहेत. ही सीरिज तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता. गेल्या सहा वर्षांपासून ही सीरिज प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

4 / 5

'पंचायत'चा पहिला सिझन 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याच्या दोन वर्षांनंतर म्हणजेच 2022 मध्ये त्याचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. 2024 मध्ये तिसरा आणि 2025 मध्ये 'पंचायत'चा चौथा सिझन स्ट्रीम झाला. या प्रत्येक सिझनमध्ये आठ-आठ एपिसोड्स आहेत.

5 / 5

'पंचायत'चा पाचवा सिझनसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिझन यावर्षी प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरच स्ट्रीम केला जाईल. या पाचव्या सिझनच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झाली नाही. फुलेरा गावाची रोमांचक कथा तुम्हाला या सिझनमध्येही पहायला मिळणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us