Indurikar Maharaj : चेहऱ्यावर हास्य आणि कुटुंबाची साथ.. इंदोरीकर महाराजांच्या जावयाचा वाढदिवस थाटात साजरा, Photo समोर

विख्यात कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलगी ज्ञानेश्वरी आणि जावई साहिल चिलप यांच्या लग्नानंतरच्या घडामोडींची चर्चा सुरू आहे. नुकतेच थाटामाटात लग्न पार पडले, त्यानंतर जेजुरी दर्शन, धोंडे जेवण आणि जावई साहिलचा वाढदिवस साजरा झाला. साहिल हे प्रसिद्ध उद्योजक कुटुंबातून असून, दोघांचेही शिक्षण पूर्ण झाले आहे.

| Updated on: Jun 03, 2026 | 2:55 PM
1 / 5
प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाप्रमाणेच त्यांच्या वक्तव्यांचीही चर्चा होत असते. आणि त्यांच्या कुटुंबात कोण, काय करतं, त्यांची पत्नी, मुलगी, मुलगा, जावई याबद्दलही जाणून घेण्यास लोक खूप उत्सुक असतात. त्यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा महिन्याभरापूर्वी विवाह झाला. 3 मे रोजी अहिल्यानगर येथे थाटामात  ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलप यांचं लग्न झालं. त्याचे फोटोही बरेच व्हायरल झाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेकांनी या सोहळ्याला हजेरी लावली. त्यांच्यासह हजारो नागरिकांनी वधुवरांना भावी आयुष्यासाठी आशीर्वाद दिले. ( All Photos : Social Media / Instagram)

2 / 5
ज्ञानेश्वरी -साहिल यांच्या लग्नानंतर ते जेजुरीला गेले होते. देवदर्शनाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. तर त्यानंतर अधिकमासात इंदोरीकर महाराजांच्या लेकं- जावयाचं धोंडे जेवणही पार पडलं.    अधिक मास सुरू झाला असून या महिन्यात लेक आणि जावई यांना घरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची आणि 'वाण' देण्याची महाराष्ट्रात सुंदर परंपरा आहे. जावयाला विष्णूचे रूप मानून हे वाण दिलं जातं.  फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव, औक्षण करून ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलप यांचं स्वागत झालं. थाटात धोंडे जेवणही पार पडलं.

3 / 5
इंदोरीकर महाराज यांचे जावई साहिल चिलप यांचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. त्यावेळी इंदोरीकर महाराज, त्यांची पत्नी, मुलगा या सर्वांनी घरी जाऊन साहिल यांना शुभेच्छा दिल्या. कुटुंबांच्या आणि पत्नी ज्ञानेश्वरीच्या साथीने साहिल यांनी लग्नानंतरचा हा पहिला वाढदिवस साजडरा केला. त्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले.

4 / 5
इंदोरीकर यांचे जावई असलेले साहिल चिलप हे नवी मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक सुनील विष्णू चिलप आणि मनीषा चिलप यांचे सुपुत्र आहेत. सुनील चिलप हे नवी मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक आहे. ते मूळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे गावचे रहिवासी असून, त्यांचे कुटुंब शेती आणि वारकरी परंपरेशी जोडलेले आहे. सध्या ते पनवेलला राहतात. चिलप कुटुंब हे अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचे असून, त्यांच्या घरात 24  तास अखंड हरिपाठ सुरू असतो, अशी माहिती समोर आली आहे.

5 / 5
ज्ञानेश्वरी आणि साहिल यांच्या लग्नाची लग्नपत्रिका खूप व्हायरल झाली, पण या लग्नपत्रिकेत दोघांच्याही शिक्षणाची माहिती नव्हती.  इंदोरीकर महाराज यांची मुलगी किती शिकली, जावयाचं शिक्षण किती झालं हेही लोकांना जाणून घ्यायची उत्सुकता होती.  साहिल यांनी इंजीनिअरिंगचं शिक्षण गेल्यावर्षीच पूर्ण केलं. तर इंदोरीकर महारजांची कन्या, ज्ञानेश्वरी हिनेही एमसी डीसीएसचं शिक्षण पूर्ण केलं.

Follow Us