iPhone 18 Pro प्रो लॉन्च होताच लोकांची या आयफोनवर झुंबड, खरेदी करण्यासाठी लोकांची विचारणा!
पण स्वस्त होण्याऐवजी iPhone 17 महागला. iPhone 17 ची किंमत आधी 82,900 रुपये होती. मात्र आता तीच किंमत थेट 99,900 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच ग्राहकांना तब्बल 17,000 अधिक मोजावे लागणार आहेत.

Apple ने iPhone 18 Pro लाँच केल्यानंतर ग्राहकांनी नव्या फोनपेक्षा जुन्या iPhone 17 चीच अधिक सर्च केली. iPhone 18 सीरिज आल्यानंतर iPhone 17 स्वस्त होईल, अशी ग्राहकांची अपेक्षा होती.
पण स्वस्त होण्याऐवजी iPhone 17 महागला. iPhone 17 ची किंमत आधी 82,900 रुपये होती. मात्र आता तीच किंमत थेट 99,900 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच ग्राहकांना तब्बल 17,000 अधिक मोजावे लागणार आहेत.
किंमत वाढल्याने ग्राहकांना धक्का बसला आहे. नवीन iPhone लाँच झाल्यानंतर जुन्या मॉडेल्सच्या किमती कमी होतात, असा सर्वसाधारण ट्रेंड आहे. मात्र Apple च्या या निर्णयामुळे iPhone 17 खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या ग्राहकांची निराशा झाली आहे.
iPhone 17e आणि iPhone 16 देखील महागले आहेत. iPhone 17e ची किंमत 64,900 रुपयांवरून 79,900 रुपये झाली आहे. या फोनच्या किमतीत 15,000 रुपयांची वाढ झाली आहे. तर iPhone 16 ची किंमत 79,900 रुपयांवर 89,900 रुपये करण्यात आली आहे. iPhone Air च्या किमतीत सर्वाधिक वाढ झालेली आहे.
iPhone Air ची किंमत आधी 1,19,900 होती. आता तीच किंमत 1,49,900 रुपये झाली आहे. म्हणजेच या मॉडेलसाठी ग्राहकांना तब्बल 30,000 अधिक खर्च करावा लागणार आहे. या सर्व स्थितीत लोक इंटरनेटवर आयफोन 17 सर्वाधिक सर्च करत आहेत. या फोनवर लोकांची झुंबड उडाली असून त्याची किंमत किती आहे, याचा ग्राहक शोध घेत आहेत.