IPL 2026 : नाव मोठं पण लक्षण…या बाबतीतही मुंबई इंडियन्स 10 टीम्समध्ये सर्वात फुस्स..

GT vs MI : IPL 2026 च्या 30 व्या सामन्यात गुजरात टायटन्स समोर मुंबई इंडियन्सच आव्हान आहे. मुंबईची टीम या सीजनमध्ये खूप खराब प्रदर्शन करत आहे. त्यात आत्ता समोर आलेले आकडे खराब आहेत.

| Updated on: Apr 20, 2026 | 3:42 PM
1 / 5
 IPL 2026 मध्ये सुरुवातीच्या 29 सामन्यानंतर 10 टीम्सच्या वेगवान गोलंदाजीचे जे आकडे समोर आलेत ते हैराण करुन सोडणारे आहेत. खास बाब म्हणजे जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर अशी मोठी नावं असून सुद्धा मुंबई इंडियन्सची गोलंदाजी सुमार ठरली आहे. (Photo: PTI)

IPL 2026 मध्ये सुरुवातीच्या 29 सामन्यानंतर 10 टीम्सच्या वेगवान गोलंदाजीचे जे आकडे समोर आलेत ते हैराण करुन सोडणारे आहेत. खास बाब म्हणजे जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर अशी मोठी नावं असून सुद्धा मुंबई इंडियन्सची गोलंदाजी सुमार ठरली आहे. (Photo: PTI)

2 / 5

मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजीची सरासरी 65.81 आहे. जी 10 टीम्समध्ये सर्वात जास्त खराब आहे. MI कडून आतापर्यंत 7 बॉलर्सनी गोलंदाजी केलीय. त्यांनी पहिल्या पाच सामन्यात 21 डावात 63.4 ओव्हर टाकल्या. 724 धावा देऊन 11 विकेट काढले. (Photo: PTI)

3 / 5

मुंबई इंडियन्सची वेगवान गोलंदाजी सरासरीच्या बाबतीत 10 टीम्समध्ये सर्वात खाली आहे. गुजरात टायटन्सची चौकडी नंबर 1 आहे. गुजरातच्या वेगवान गोलंदाजीत सिराज, रबाडा, प्रसिद्ध आणि अशोक शर्मा हे खेळाडू आहेत. या चौघांची सरासरी मिळून 24.89 आहे. 10 टीम्समध्ये ही सर्वात कमी सरासरी आहे. त्यांनी पहिल्या 5 सामन्यात 75 ओव्हर टाकले. 722 धावा देऊन 29 विकेट काढले. (Photo: PTI)

4 / 5

IPL 2026 चांगल्या सरासरीच्या बाबतीत CSK ( 25.9) पेस अटॅक दुसऱ्या नंबरवर आहे. RCB ( 26.16), SRH ( 27.1) आणि RR ची सरासरी (28.08) आहे. (Photo: PTI)

5 / 5

LSG या लिस्टमध्ये सहाव्या नंबरवर आहे. त्यांच्या वेगवान गोलंदाजीची सरासरी 28.21 आहे. KKR आणि DC च्या वेगवान गोलंदाजीची सरासरी 33 पेक्षा जास्त आहे. पंजाब किंग्सच्या पेस अटॅकची सरासरी 38 आहे. (Photo: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us