IPL 2026 मध्ये एक नियम सर्वच कॅप्टन्सना पडला भारी, आतापर्यंत 5 खेळाडूंना शिक्षा
आयपीएल 2026 मध्ये एक नियम सर्वच कॅप्टन्सवर भारी पडतोय. आतापर्यंत पाच खेळाडूंनी या नियमाची शिक्षा सहन केलीय. आयपीएल स्पर्धा आता खऱ्या अर्थाने रंगात आली आहे.

आयपीएलमध्ये पाच कॅप्टन्सवर स्लो ओव्हआर रेटच्या दंडाची कारवाई करण्यात आली आहे. यात सर्वात वर श्रेयस अय्यर आहे. त्याने दोनवेळा चूक केली. श्रेयस अय्यरवर आतापर्यंत 36 लाख रुपये दंडाची कारवाई झाली आहे. श्रेयस पंजाब किंग्सचा कॅप्टन आहे. श्रेयसवर आधी 12 लाख आणि दुसऱ्यांदा 24 लाख दंडाची कारवाई झाली.

गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुबमन गिलवर सुद्धा स्लो ओव्हर रेटसाठी पेनल्टीची कारवाई झाली आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरातचा स्लो ओव्हर रेट होता.

आयपीएल 2026 मध्ये स्लो ओव्हर रेटचा कोलकाता नाइट रायडर्सचा कॅप्टन अजिंक्य रहाणेला सुद्धा फटका बसला. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध टीम हरलीच. पण स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाखाचा दंड ठोठावण्यात आला. आतापर्यंत पाच कॅप्टन्सना 84 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मुंबई इंडियन्सची आयपीएल 2026 मध्ये खराब स्थिती आहे. या टीमचा कॅप्टन हार्दिक पंड्यावर सुद्धा दंड लावण्यात आला. मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्याला आरसीबी विरुद्धच्या सामन्यात 12 लाख दंड लावण्यात आला.

चेन्नई सुपरकिंग्स बद्दल बोलायचं झाल्यास तर त्यांचा सुद्धा दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध स्लो ओव्हर रेट होता. ऋतुराज गायकवाडवर दंड ठोठावण्यात आलेला.