US-Iran Talk : अमेरिकेसोबत शांतता वाटाघाटीआधीच इराण झुकला, स्ट्रेट ऑफ हॉर्मुजवर आली मोठी Good News
US-Iran Strait Of Hormuz : अमेरिका-इराणमध्ये दोन आठवड्यांसाठी सीजफायर झालं आहे. त्यामुळे सध्या युद्ध थांबलं आहे. पण स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधील जल वाहतूक अजून पूर्ववत झालेली नाही. कारण हॉर्मुज पूर्णपणे खुलं करण्याच्या अटीवर सीजफायरची घोषणा झाली होती. पण अजून इथली जल वाहतूक मुक्तपणाने सुरु नाही.

स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधून 20 टक्के जगातिक तेल वाहतूक होते. हॉर्मुजमध्ये जे घडतय त्याचा फटका भारतालाही बसतोय. युद्धाला सुरुवात झाल्यापासून स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये इराणने दादागिरी सुरु केली. मूळात म्हणजे हा नैसर्गिक जलमार्ग आहे. पण इराणने इथून जाणाऱ्या जहाजांवर टोल वसुलीची मागणी केली आहे. Getty Images
युद्धाचा आधार घेत देशात झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये टोल वसुलीला अधिकृत मान्यता देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी ते सतत धमक्या देत आहेत. अमेरिकेसह जगातील सर्वच देशांचा या मागणीला विरोध आहे. भारताने तर हॉर्मुजमधील जलवाहतूक पूर्णपणे मुक्त असली पाहिजे हे आधीच म्हटलं आहे. Getty Images
आता हॉर्मुज पार करण्यासाठी इराणची परवानगी घ्यावी लागते. इराण त्यासाठी जहाजांकडून 20 लाख डॉलरचा टोल घेतो. इराण या टोल वसुलीला अधिकृत करण्यासाठी अडून बसला होता. पण आता त्यांची भूमिका नरमली आहे. Getty Images
स्ट्रेट ऑफ हॉर्मुजचा जल मार्ग दोन देशांमधून जातो ओमान आणि इराण. ओमानमध्ये हॉर्मुजचा जो भाग आहे, तिथून जहाजं मुक्तपणे, कुठल्याही हल्ल्याच्या भितीशिवाय मार्गस्थ होऊ शकतात. अमेरिकेसोबत होणाऱ्या शांतता वाटाघाटीमध्ये इराणने हा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधील ही टोलधाड बंद होईल. Getty Images
ओमानची भूमिका ध्यानात घेऊन हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. कारण या नैसर्गिक जलमार्गावर कोणताही टोल आकारणार नाही अशी ओमानने घोषणा केली होती. यामुळे जगात व्यवस्था बिघडेल असं ओमानचं म्हणणं होतं. Getty Images