
इस्रायल आणि इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा आज सहावा दिवस आहे. दोन्ही देशांकडून परस्परांवर जोरदार मिसाइल हल्ले सुरु आहेत.

इराण इस्रायलच्या नागरी वस्त्यांना लक्ष्य करत आहे. पण त्यात त्यांना इमारती जमीनदोस्त करण्यापलीकडे फार काही साध्य करता येत नाहीय.

दुसऱ्याबाजूला इस्रायल इराणच्या लष्करी सामर्थ्यावर हल्ला करत आहेत. म्हणजे मूळावर घाव घालत आहे. इस्रायली सैन्यदलाने बुधवारी रात्री इराणच्या लष्करी इन्फ्रास्ट्रक्चरला टार्गेट केलं.

इस्रायलने आतापर्यंत इराणच्या नागरीवस्त्यांना लक्ष्य केलेलं नाही. कारण इराणच्या नागरिकांनी तिथल्या सत्तेविरोधात उठावा करावा अशी इस्रायलची भूमिका आहे.


अणूबॉम्ब निर्मितीमध्ये सेंट्रीफ्यूजचा वापर होतो. इस्रायलने थेट तिथे हल्ला करुन इराणच्या अणवस्त्र महत्वकांक्षेला मोठा धक्का दिला. सोबतच इराणच्या मिसाइल उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना लक्ष्य केलं.

मोसादकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारावर इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमधील लष्करी तळांना टार्गेट केलं.

अणूबॉम्ब बनवण्यात युरेनियम हा महत्त्वाचा घटक आहे. याच युरेनियमच्या शुद्धी करणासाठी सेंट्रीफ्यूज साइटचा वापर केला जातो. नागरी उद्देशांसाठी जितक्या युरेनियमची गरज लागते. त्यापेक्षा इराणकडून जास्त प्रमाणात युरेनियम शुद्धीकरण सुरु आहे.

हे सर्व फक्त अणूबॉम्ब बनवण्यासाठी सुरु असल्याचा इस्रायलचा आरोप आहे. त्यासाठीच या युद्धाची सुरुवात झाली आहे. इस्रायली एअर फोर्सने तेहरानमधील ज्या सेंट्रीफ्यूज साईटला लक्ष्य केलं, ती सध्या कार्यरत नाहीय. पण इराणची युरेनियम शुद्धीकरणाची क्षमता मोडून काढणं हा त्यामागचा उद्देश आहे.

इस्रायलने नतांज येथील अण्विक प्रकल्पावर हल्ला केला. तिथे वीज प्रवाह खंडीत झाला. त्यामुळे सेंट्रीफ्यूज ऑपरेशन बंद झालय. फॉर्डो येथील प्रकल्प जमिनीखाली आहे. तिथे 60 टक्क्यापर्यंत युरेनियम शुद्धीकरण झालेलं आहे. या साईटच काही नुकसान झालेलं नाही.