Jailer 2 Box Office Collection: वयाच्या 75व्या वर्षीही जलवा! रजनीकांत यांच्या जेलर 2ची कमाल, रचला नवा इतिहास, कमावले इतके कोटी
Jailer 2 Box Office Collection: सुपरस्टार रजनीकांत हे वयाच्या 75व्या वर्षी देखील सिनेसृष्टीमध्ये प्रचंड सक्रिय आहेत. त्यांच्या जेलर 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा ‘जेलर २’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या काही दिवसांपासून आतुरतेने वाट पाहात होते. आता अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या क्रेझ त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरुन दिसून देते. चला जाणून घेऊया चित्रपटाने किती कमाई केली आहे.
जेलर 2 या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच चांगली कमाई केली आहे. आता चित्रपटाने ओपनिंग वीकेंड उत्कृष्ट ठरवल्यानंतर पाचव्या सोमवारी म्हणजेच पहिल्या सोमवारी किती कमाई केली आहे? चला जाणून घेऊया...
रजनीकांतने सिद्ध केले आहे की बॉक्स ऑफिसवर त्यांचा दबदबा वयाच्या 75व्या वर्षी देखील कायम आहे. सिनेमागृहांमध्ये अनेक नवीन आणि काही आठवडे जुने चित्रपट असतानाही ‘जेलर २’ प्रेक्षकांची पहिली पसंती ठरली आहे. जरी रिलीजनंतर त्याला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असल्या तरीही तरी पॉझिटिव्ह वर्ड ऑफ माउथ ‘जेलर २’च्या बाजूने आहे. त्यामुळे सिनेमा जोरदार कमाई करत आहे.
चित्रपटाच्या कलेक्शनची गोष्ट सांगायची तर, रजनीकांत स्टाररने रिलीजच्या पहिल्या दिवशी ५९.७० कोटी रुपयांनी खाते उघडले होते. दुसऱ्या दिवशी ‘जेलर २’ ने ३७.१० कोटी रुपये कमावले. तिसऱ्या दिवशी चित्रपटाची कमाई ४७.२५ कोटी रुपये झाली. चौथ्या दिवशी या चित्रपटाने ५५.८५ कोटी रुपये कमावले.
आता सॅटनिलिकच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘जेलर २’ ने रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजे पहिल्या सोमवारी ४२.३५ कोटी रुपये कमावले कमाई केली आहे. यात तमिळमध्ये चौथ्या दिवशी ३१.४० कोटी, तेलुगूमध्ये ७.१५ कोटी, हिंदीत ३.३५ कोटी आणि कन्नडमध्ये ४५ लाख रुपये कमाई झाली आहे. त्याचबरोबर ‘जेलर २’ ची भारतातील पाच दिवसांची नेट कमाई आता २४२.२५ कोटी रुपये झाली आहे.