Paskistani Actress : छोट्या व्हिडिओने सुरुवात, मग सोशल मीडियावर हिट, आता बनली हिरॉईन, कोण आहे ही पाकिस्तानी सौंदर्यवती जिला 2.56 कोटी लोक करतात फॉलो
Paskistani Actress : पाकिस्तानी अभिनेत्रींची तिथल्या सौंदर्यवतींची भारतातही बरीच चर्चा होते. पाकिस्तानात टिकटॉकवर सर्वात जास्त फॉलोअर्स कोणाचे आहेत?. तिचं नाव आहे जन्नत मिर्जा. तिच्यासमोर अनेक मोठे स्टार्सही छोटे वाटतात. टिकटॉकवर तिचे 2.56 कोटी फॉलोअर्स आहेत. उपलब्ध रँकिंगमध्ये पाकिस्तानात सर्वात जास्त फॉलो होणारी ती टिकटॉक क्रिएटर आहे.

जन्नत मिर्जाच्या टिकटॉक अकाउंटवर 3400 पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत. तिच्या व्हिडिओला 91.5 कोटी पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. पाकिस्तानातील चर्चित डिजिटल क्रिएटर्समध्ये तिचा समावेश होतो.
जून 2024 मध्ये तिच्या लोकप्रियतेमध्ये मोठी वाढ झाली. त्यावेळी टिकटॉकवर तिने 2.5 कोटी फॉलोअर्स पूर्ण केले. त्यावेळी पाकिस्तानी मीडियाने मोठ्या प्रमाणात जन्नत मिर्जाची दखल घेतलेली. सोशल मीडियावर तिची लोकप्रियता वाढलेली. तिच्या फॉलोअर्सची संख्या सध्या 2.56 कोटी आहे.
जन्नत मिर्जाची ओळख फक्त टिकटॉक पुरता मर्यादीत नाही. इन्स्टाग्रामच्या माध्यमातूनही ती लाखो लोकांशी कनेक्ट आहे. त्याशिवाय पाकिस्तानी चित्रपट 'तेरे बजरे दी राखी' मध्ये सुद्धा तिने काम केलं आहे. छोट्या छोट्या व्हिडिओ मधून सुरु झालेला तिचा प्रवास आता सोशल मीडियाच्या पुढे मनोरंजन क्षेत्रापर्यंत पोहोचला आहे.
पाकिस्तानी टिकटॉक रँकिंगमध्य जन्नत मिर्जानंतर कंवल आफताब जवळपास 2.2 कोटी फॉलोअर्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. अली हैदराबादीचे 2.17 कोटी फॉलोअर्स आहेत.
जन्नत मिर्जाची लोकप्रियता किती मोठी आहे याचा अंदाज ती आणि दुसऱ्या स्थानावरील क्रिएटर यांच्यामध्ये जवळपास 36 लाख फॉलोअर्सचं अंतर आहे.जन्नत मिर्जाच्या स्टोरीमधून पाकिस्तानात सोशल मिडिया कसा बदलतोय ते दिसून येतं. पाकिस्तानात टिकटॉक प्लॅटफॉर्मने क्रिएटर्सना थेट कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली.