प्रचंड सुंदर अभिनेत्री, जिची 1 झलक पाहण्यासाठी थिएटरमध्ये व्हायची प्रचंड गर्दी, 10 वर्षांपासून गायब आहे अभिनेत्री

इंडस्ट्रीमधील एक अशी अभिनेत्री जिची एक झलक पाहण्यासाठी थिएटरमध्ये व्हायची प्रचंड गर्दी. जिने दिलेत अनेक बोल्ड सीन. पण गेल्या 10 वर्षांपासून आहे गायब?

| Updated on: Apr 15, 2026 | 1:19 PM
1 / 5
चित्रपटसृष्टीत पडद्यावर झळकणाऱ्या कलाकारांचे आयुष्य जितके रंगीबेरंगी दिसते, तितकेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात संघर्ष, त्याग आणि वेदनांनी भरलेले वास्तव दडलेले असते. कॅमेऱ्यासमोर हसतमुख दिसणारे हे कलाकार कॅमेऱ्याच्या मागे मात्र अनेक अडचणींना सामोरे जात असतात.

चित्रपटसृष्टीत पडद्यावर झळकणाऱ्या कलाकारांचे आयुष्य जितके रंगीबेरंगी दिसते, तितकेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात संघर्ष, त्याग आणि वेदनांनी भरलेले वास्तव दडलेले असते. कॅमेऱ्यासमोर हसतमुख दिसणारे हे कलाकार कॅमेऱ्याच्या मागे मात्र अनेक अडचणींना सामोरे जात असतात.

2 / 5

आज आपण साऊथ इंडस्ट्रीतील अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत, जिने आपल्या बोल्ड भूमिकांमुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले, पण तिला अपेक्षित यश कधीच मिळाले नाही. ही अभिनेत्री म्हणजे अनामिका प्रवालिका.

3 / 5

अनामिका प्रवालिकाने मोठी स्वप्ने घेऊन चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. तिला नायिका म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची होती. मात्र, अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही आणि उलट तिच्यावर ‘बोल्ड अभिनेत्री’ असा शिक्का बसला.

4 / 5

जयं या चित्रपटात तिने गोपीचंद यांच्या गर्लफ्रेंड आणि घरकाम करणाऱ्या मुलीची भूमिका साकारली होती, ज्यामुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिची भूमिका छोटी असली तरी त्यातील ग्लॅमर आणि अभिनयामुळे त्या काळातील तरुणांमध्ये ती खूप लोकप्रिय झाली.

5 / 5

या चित्रपटानंतर तिला मिळालेल्या बहुतेक भूमिका बोल्ड स्वरूपाच्या होत्या. मात्र, गेल्या 10 वर्षांहून अधिक काळापासून अनामिका प्रवालिका चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. सध्या ती लग्न करून चेन्नई येथे स्थायिक झाली आहे. एकेकाळी ग्लॅमर स्टार म्हणून झळकणारी ही अभिनेत्री आता लाईमलाइटपासून दूर आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us