विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपची दाणादाण; केशव उपाध्येंचा महायुतीला विचार करायला लावणारा सवाल

विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपची दाणादाण उडाली. विधानपरिषदेच्या 5 जागांपैकी 2 जागांवर महायुतीला पराभवाला सामोरे जावं लागलं. या निकालावर केशव उपाध्येंनी पहिली प्रतिक्रिया दिली.

| Updated on: Oct 29, 2026 | 11:01 AM
1 / 5
राज्यातील विधानपरिषदेच्या 5 जागांवर निवडणुका पार पडल्या. या पाच जागांपैकी 3 जागांवर भाजपला पराभवाचा सामना करावा लागला.

राज्यातील विधानपरिषदेच्या 5 जागांवर निवडणुका पार पडल्या. या पाच जागांपैकी 3 जागांवर भाजपला पराभवाचा सामना करावा लागला.

2 / 5

नागपूरच्या निवडणुकीत पक्षातील दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरले होते. त्यानंतरही नागपूर विभागात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवावरून भाजप नेते नवनाथ बन यांनी शिंदे गटावर खापर फोडलं आहे.

3 / 5

विधानपरिषदेच्या निकालानंतर भाजप नेते केशव उपाध्ये यांनी महायुतील सवाल केला आहे. त्यांनी 'एक्स'वर पोस्ट करत सवाल केला आहे.

4 / 5

'पाच जागांच्या निकालानंतर तरी ‘महायुती’ म्हणून आत्मचिंतन करणार आहोत का?एकत्रित लढलो असतो तर पाचही जागा जिंकण्याची सहज शक्यता असताना दोन वर का थांबलो याचा विचार करणार आहोत का? असा सवाल केशव उपाध्ये यांनी केला.

5 / 5

दुसरीकडे केशव उपाध्ये यांच्यानंतर सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल यांनीही त्यांच्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी कठोर आत्मपरिक्षण करावे लागेल, असं म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us