‘कुछ कुछ होता है’मधील अंजलीने परिधान केला 28 वर्षांपूर्वीचा चित्रपटातील टी-शर्ट, लूक पाहून व्हाल थक्क
'कुछ कुछ होता है'मधील अंजली परिधान केला चित्रपटातील तो खास टी-शर्ट. 28 वर्षानंतर त्या टी-शर्टमध्ये अंजलीचं सौंदर्य पाहून चाहते थक्क. कशी दिसते?

शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘कुछ कुछ होता है’ या लोकप्रिय चित्रपटाला 28 वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास निमित्ताने अभिनेत्री सना सईदने चित्रपटाशी संबंधित एक खास आठवण सोशल मीडियावर शेअर केली आहे.
तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत चित्रपटातील प्रसिद्ध ‘कॅम्प सनशाइन’ टी-शर्टची झलक दाखवली. सना सईदने सांगितले की, तिने वयाच्या आठव्या वर्षी हा टी-शर्ट शेवटचा घातला होता.
आता अनेक वर्षांनंतर पुन्हा तो टी-शर्ट परिधान करताना तिला जुन्या आठवणी जाग्या झाल्या. हा टी-शर्ट घातल्यानंतरही घरच्यासारखी भावना निर्माण होत असल्याचे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.
करण जौहर दिग्दर्शित या चित्रपटात सनाने शाहरुख खानच्या राहुल खन्ना या व्यक्तिरेखेच्या मुलीची, अंजलीची भूमिका साकारली होती. तिच्या बालकलाकाराच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती.
चित्रपटाच्या 28 व्या वर्धापनदिनानिमित्त निर्मात्यांनीही सोशल मीडियावर खास व्हिडिओ शेअर करत आनंद व्यक्त केला. सुरुवातीला चित्रपटाला मर्यादित स्क्रीन मिळाल्या होत्या. मात्र, प्रेक्षकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले.