Ladki Bahin : लाडक्या बहिणींच्या खात्यात आता थेट 6000 रुपये, चार महिन्याचे पैसे एकदाच मिळणार; मोठी माहिती समोर!
ज्या लाडक्या बहिणींना एकूण चार महिन्यांचे पैसे मिळालेले नाहीत, त्यांच्यासाठी आता एक आनंदाची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चार महिन्यांपासून ज्या पात्र महिलांना पैसे मिळालेले नाहीत, त्यांना आता एकदाच 6000 रुपये दिले जाऊ शकतात.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रत्येक महिलांना 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. परंतु ई-केवायसी करूनही काही महिलांना फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे अशा चार महिन्यांचे पैसे मिळालेले नाहीत.

ज्या लाडक्या बहिणींना एकूण चार महिन्यांचे पैसे मिळालेले नाहीत, त्यांच्यासाठी आता एक आनंदाची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चार महिन्यांपासून ज्या पात्र महिलांना पैसे मिळालेले नाहीत, त्यांना आता एकदाच 6000 रुपये दिले जाऊ शकतात.

एकीकडे ई-केवायसीमुळे एकूण 80 लाख महिलांचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून काढून टाकण्यात आले आहे. दुसरीकडे ई-केवायसी करूनही काही महिलांना चार-चार महिन्यांचे पैसेच आलेले नाहीत. याच महिलांसाठी ही खुशखबर आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार चार महिन्यांचे पैसे न आलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात आता दोन टप्प्यांत 6000 रुपये पाठवले जाऊ शकतात. फेब्रुवारी-मार्च महिन्याचे 3000 आणि एप्रिल-मे महिन्याचे 3000 रुपये अशा महिलांना मिळू शकतात.

दरम्यान, पात्र महिलांना याआधीच्या चार महिन्यांचे पैसे दोन टप्प्यांत दिले जाऊ शकतात, असे सांगितले जात आहे. याबाबत सरकारने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. सरकारने याबाबतची अधिकृत माहितीदेखील अद्याप दिलेली नाही.