Ladki Bahin Yojana : मार्च एप्रिलच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! महत्त्वाचा शासन निर्णय जारी

Ladki Bahin Yojana : 2024मध्ये सुरु करण्यात आलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेबाबत अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

| Updated on: May 21, 2026 | 9:48 AM
1 / 5
महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या थकीत हप्त्यांबाबत एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. २०२४मध्ये सुरु झालेल्या या योजनेबाबत गेल्या काही दिवसांपासून चिंता व्यक्त केली जात होती. आता महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या थकीत हप्त्यांबाबत एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. २०२४मध्ये सुरु झालेल्या या योजनेबाबत गेल्या काही दिवसांपासून चिंता व्यक्त केली जात होती. आता महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

2 / 5

मार्च आणि एप्रिल २०२६ च्या हप्त्यांच्या वितरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ७३०.५१ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या दोन्ही महिन्यांच्या पैशांची वाट पाहणाऱ्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात आता लवकरच रक्कम जमा होणार आहे.

3 / 5

जुलै २०२४ पासून सुरू झालेल्या या अत्यंत लोकप्रिय योजनेअंतर्गत, गेल्या आठवड्यात (१४ मे पासून) महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती. मात्र, तांत्रिक किंवा निधीच्या अडचणींमुळे अनेक महिलांना दोन्ही महिन्यांचे एकत्र पैसे मिळाले नव्हते, तर काहींना केवळ एकाच महिन्याची रक्कम मिळाली होती. यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.

4 / 5

महिलांची हीच अडचण दूर करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने आज (२१ मे रोजी) एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी केला आहे. वित्त विभागाच्या मान्यतेनुसार हा निधी आता थेट वितरित केला जाणार आहे.

5 / 5

शासनाने हा निधी तातडीने मंजूर केल्यामुळे, आता तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून येत्या काही दिवसांतच उर्वरित पात्र महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे थकीत पैसे वर्ग केले जातील. यामुळे लाखो लाडक्या बहिणींना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us