62 वर्षांपूर्वाचं सुपरहिट गाणं, ज्याला दिग्दर्शकाने दिलेला नकार, डोक्यावर चप्पल मारायला झालेला तयार

बॉलिवूडमधील या गाण्याची धून ऐकल्यानंतर दिग्दर्शकाने दिलेला नकार. मात्र, जेव्हा परत या गाण्याची धून ऐकली तेव्हा दिग्दर्शक म्हणालेला 'मेरा जूता कहां है?'. स्वत:वरच नाराजी केलेली व्यक्त.

| Updated on: May 31, 2026 | 10:05 AM
1 / 5
हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर गाण्यांपैकी एक असलेले ‘लग जा गले’ आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजात आणि मदन मोहन यांच्या सुरेल संगीताने सजलेले हे गीत 1964 मधील 'वो कौन थी?' या चित्रपटातील आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर गाण्यांपैकी एक असलेले ‘लग जा गले’ आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजात आणि मदन मोहन यांच्या सुरेल संगीताने सजलेले हे गीत 1964 मधील 'वो कौन थी?' या चित्रपटातील आहे.

2 / 5

मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शक राज खोसला यांनी सुरुवातीला या गाण्याची धून नाकारली होती. मदन मोहन यांनी तयार केलेली धून ऐकल्यानंतर राज खोसला यांना ती अपेक्षेप्रमाणे प्रभावी वाटली नव्हती. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

3 / 5

मात्र, नंतर झालेल्या एका बैठकीत अभिनेता मनोज कुमार यांच्या आग्रहावरून ही धून पुन्हा ऐकवण्यात आली. यावेळी मदन मोहन यांनी पूर्ण भावनेने धून सादर केली आणि ती ऐकताच राज खोसला यांचे मत पूर्णपणे बदलले.

4 / 5

धून ऐकल्यानंतर त्यांनी विनोदी शैलीत 'माझा बूट कुठे आहे?' असे विचारत स्वतःचीच चूक मान्य केली. इतक्या सुंदर धूनला पहिल्यांदा नाकारल्याबद्दल त्यांना पश्चात्ताप झाल्याचे त्यांनी सांगितले.

5 / 5

पुढे ‘लग जा गले’ हे गाणे चित्रपटाची ओळख बनले आणि भारतीय संगीतविश्वातील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक ठरले. सहा दशकांनंतरही या गाण्याची जादू तितकीच कायम आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us