
अनेकदा चपात्या केल्यानंतर त्या शिल्लक राहतात. त्यात शिळी चपाती खाताना सर्वजण तोंड वाकडं करतात. मग त्यांचं काय करायचं असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. आज आम्ही तुम्हाला शिळ्या चपत्यांचा वापर करुन तुम्ही टाको बनवू शकता.

उरलेल्या चपात्यांपासून टाको बनवण्यासाठी तुम्हाला उरलेल्या चपात्या, उकडलेले बटाटे, कांदा, सिमला मिरची, गाजर, स्वीट कॉर्न, बटर, शेजवान सॉस आणि हिरव्या मिरच्या यासारख्या साहित्यांची आवश्यकता असेल.

चपातीपासून टाको बनवण्यासाठी प्रथम बटाटे उकडून त्याची साल काढून ते किसून घ्या. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची, चिरलेले गाजर, स्वीट कॉर्न, हिरव्या मिरच्या सर्व काही मिसळा.

तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही बटाट्यांऐवजी पनीर देखील वापरू शकता. त्यानंतर या मिश्रणात चिली सॉस, चवीनुसार मीठ, हळद, लाल मसाला आणि चिली फ्लेक्स घाला.

यानंतर आता चपातीवर शेजवान चटणी पसरवा. त्यात टोमॅटो सॉस घाला. नंतर त्यात तयार केलेले मिश्रण घाला. आता त्यात चीज घाला आणि चपातीची घडी करा.

नंतर पॅनवर बटर लावा आणि टाको दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत फ्राय करा. आता हे टाको तुम्ही ते चटणी आणि टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करू शकता.