जगातील सर्वात मोठा ‘फिश मार्केट’ कुठे आहे? जाणून वाटेल आश्चर्य
जगभरात मासे खाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. अनेक प्रकारच्या माशांची चव चाखण्यासाठी खवय्ये उत्सुक असतात. शिवाय कोणत्या बाजारात सर्वात जास्त माशांचे प्रकार आहेत आणि कोणतं फिश मार्केट सर्वात जास्त मोठं आहे... अशी चर्चा देखील कायम मासे प्रेमींमध्ये रंगलेली असते... तर आज जगातील सर्वात मोठ्या फिश मार्केटबद्दल जाणून घेऊ....

माशांचं सर्वांत मोठं मार्केट जापान या देशात आहे. जापानची राजधानी टोक्यो येथील सुकिजी याठिकाणी जगातील सर्वांत मोठं फिश मार्केट आहे. सुकिजी येथील बाजार एक होलसेल मार्केट आहे..

सुकिजी याठिकाणी असलेल्या 'फिश मार्केट'मध्ये फळे, भाज्या देखील मिळतात. पण सुकिजी याठिकाणी असलेला बाजार समुद्रातील जीव आणि माशांसाठी प्रसिद्ध आहे.

रिपोर्टनुसार, सुकिजी येथे असलेल्या मार्केटमध्ये प्रत्येक दिवशी 2000 मीट्रिक टन सीफूड विक्री होतो. हा मार्केट 1935 पासून सुरु आहे. अनेक पर्यटक देखील सुकिजी मार्केटला भेट देतात.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्केट पूर्वी निहोनबशी नदी किनारी होता. येथे मासे खरेदी करण्यासाठी बोली लावली जायची... ही बोली सकाळी 5.30 ते 10 वाजे पर्यंत सुरु असायची...

आज देखील जापानची राजधानी टोक्यो येथील सुकिजी याठिकाणी असलेलं फिश मार्केट चर्चेत असते. मार्केटमध्ये अनेक प्रकारचे मासे मिळतात. मार्केटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील होत असतात.