Flaxseed Benefits | थंडीच्या दिवसांत ‘आळशी’ ठरेल अतिशय गुणकारी, जाणून घ्या याचे अधिक फायदे…

थंडीच्या मोसमात शरीराची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, कारण थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला याकाळात आजारी बनवू शकतो. आज आम्ही तुम्हाला आळशीच्या बियांचे फायदे सांगणार आहोत. आळशी अर्थात फ्लॅक्ससीड प्रभावाने उष्ण आहे आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे.

1/6
थंडीच्या मोसमात शरीराची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, कारण थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला याकाळात आजारी बनवू शकतो. आज आम्ही तुम्हाला आळशीच्या बियांचे फायदे सांगणार आहोत. आळशी अर्थात फ्लॅक्ससीड प्रभावाने उष्ण आहे आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. आळशी सर्व रोगांपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त मानले जाते.

2/6
आळशी बॅड कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास मदत करते. आळशीचे दररोज सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी 6 ते 11 टक्क्यांनी कमी होऊ शकते. याच्या सेवनाने हृदयाचे ठोके सामान्य राहतात. अशाप्रकारे आळशी ‘हार्ट फ्रेंडली’ असल्याचे म्हटले जाते.

3/6
व्हिटॅमिन बी-1, प्रथिने, तांबे, मॅंगनीज, ओमेगा-3 आम्ल, लिग्नॅन्स यासह अनेक सूक्ष्म पोषक तत्त्वे आळशीमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी आळशी खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले फायबर आणि ओमेगा-3 आम्ल शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित करतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी आणि झोपेच्या वेळी एक चमचा आळशी घेणे खूप फायदेशीर ठरते.

4/6
आजकाल लठ्ठपणामुळे लोकांना अनेक आजार होतात. आळशीमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय, असे अनेक पोषक घटक आहेत, जे लठ्ठपणा नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त मानले जातात. यासोबतच ते खाल्ल्याने पचनक्रियाही सुधारते.

5/6
आळशीमध्ये सांधेदुखीविरोधी गुणधर्म असतात. संधिवातच्या रुग्णांनी दररोज आळशीचे सेवन केल्याने खूप फायदा होतो. यासाठी तुम्ही रोज भाजलेली आळशी खाऊ शकता किंवा तो बारीक करून दुधासोबत सेवन करू शकता. याशिवाय हिवाळ्यात आळशीचे लाडूही खाता येतात.

6/6
असे म्हणतात की, ज्या महिला आळशीचे नियमित सेवन करतात, त्यांना मासिक पाळीत अधिक त्रास सहन करावा लागत नाही. हार्मोनल असंतुलनाची समस्या दूर करण्यासाठी आळशीच्या बिया उपयुक्त मानल्या जातात.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI