GK : एलपीजी गॅस असतो मग त्याला लिक्विफाईड गॅस असं का म्हणतात? लॉजिक काय?

| Updated on: Apr 07, 2026 | 12:16 AM
1 / 5
इराणच्या युद्धामुळे भारतात मोठे उर्जासंकट निर्माण झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या निर्मितीसाठी कच्च्या तेलाची भारताला कमतरता भासत आहे. सोबतच नैसर्गिक वायूदेखील वेळेवर मिळत नाहीये.

2 / 5
त्यामुळेच भारात एलपीजी गॅसचाही तुटवडा निर्माण झाल आहे. एलपीजी गॅसची किंमत वाढली आहे. सोबतच घरगुती गॅस बुकिंग करुनही तो वेळेवर मिळत नाहीये. या सर्व  घडामोडी घडत असतानाच एलपीजी नेमका काय आहे? तो कसा बनवला जातो, असेही प्रश्न अनेकांना पडले आहेत.

3 / 5
दरम्यान, हा एलपीजी गॅस असूनही त्याला लिक्वीड का म्हणतात हे जाणून घेऊ या. एलपीजी गॅस प्रोपेन आणि ब्युटेन या दोन गॅसपासून तयार केला जातो. एलपीजी सामान्य तपमानात वायूरुपात असतो. परंतु गॅसच्या सिलिंडरमध्ये भरण्यासाठी त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात..

4 / 5
वेगवेगळ्या प्रक्रिया करून या गॅसला द्रवरुप दिले जाते. आणि गॅस सिलिंडरमध्ये भरले जाते. असे केल्याने एलपीजीचे साठवणूक करणे सोपे होते. तसेच त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या टिकाणी नेणेही सोपे होते.

5 / 5
एलपीजी गॅसला द्रवरुप मिळाल्याने तो छोट्या सिलिंडरमध्ये जास्त प्रमाणात साठवला जाऊ शकतो. हा गॅस जोपर्यंत सिलिंडरमध्ये असतो तोपर्यंत तो द्रवरुपात असतो. परंतु नळीच्या माध्यमातून बाहेर आल्यावर तो परत गॅसरुपात बाहेर येतो. म्हणूनच एलपीजी हा गॅस असला तरी लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस असे म्हणतात.

Follow Us