Holi 2026 : समीर चौगुले, नम्रता संभेराव, वनिता खरात..; रंगात रंगले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’चे कलाकार

महाराष्ट्रातील आणि जगभरातील सगळ्या प्रेक्षकांना महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमने होळी आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या कार्यक्रमाची विशेष झलक महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाच्या येत्या भागात दाखवली जाणार आहे.

| Updated on: Mar 02, 2026 | 11:55 AM
1 / 5
देशभरात सध्या होळीचा उत्साह पहायला मिळत असून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोच्या संपूर्ण टीमनेही यंदाची रंगपंचमी मोठ्या जल्लोषात साजरी केली आहे. 'हास्यजत्रेची रंगपंचमी- खेळ खेळुया होळीचा' या विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व कलाकार एकत्र आले.

2 / 5
रंग, संगीत आणि नृत्याच्या ठेक्यावर सर्व कलाकारांनी रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटला. या रंगतदार सोहळ्याला कार्यक्रमाचे दिग्दर्शक आणि निर्माते सचिन गोस्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.

3 / 5
समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, श्याम राजपूत, मंदार मांडवकर, शिवाली परब, रोहित माने, वनिता खरात, प्रथमेश शिवलकर  ओंकार राऊत, अरुण कदम, निखिल बने, दत्तू मोरे आणि विराज जगताप हे सर्व कलाकार उपस्थित होते. सोबतच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमची संगीत टीमदेखील या उत्सवात सहभागी झाली होती.

4 / 5
या कार्यक्रमात कलाकारांनी गाणी गात, ठेका धरत आणि तुफान डान्स करत रंगांची उधळण केली. यासोबतच धमाल असे निरनिराळे गेम्सदेखील कलाकार खेळले आणि एकमेकांसोबत हास्यविनोद करत रंगपंचमीचा आनंद द्विगुणित केला.

5 / 5
पारंपरिक आणि धमाल गाण्यांवर सगळ्यांनी एकत्र येत रंगपंचमी साजरी केली. रंगांच्या उधळणीसोबत हास्याचा वर्षावही पाहायला मिळाला. संपूर्ण वातावरणात उत्साह, मैत्री आणि आनंदाची रंगत पाहायला मिळाली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ परिवाराने एकत्र येत साजरी केलेली ही रंगपंचमी प्रेक्षकांसाठीही खास ठरली.

Follow Us