घटस्फोट होताच प्रसिद्ध अभिनेत्रीचं नवं अफेअर? अंकिता लोखंडे भडकली, म्हणाली हे खूपच…

छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री माही विज हिचा नुकताच घटस्फोट झाला आहे. तिच्या घटस्फोटानंतर आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. यावर अंकिता लोखंडे चांगलीच भडकली आहे.

| Updated on: Jan 11, 2026 | 8:02 PM
1 / 6
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री माही विज हिचा जय भानुशालीसोबत नुकताच घटस्फोट झाला आहे. घटस्फोटाची ही बातमी समोर आल्यानंतर आता सोशल मीडियावरील ट्रोलर्सने माही विजचे नाव नदीम नाज याच्याशी जोडण्यास सुरुवात केली आहे. नदम नाज हा माही विजचा बेस्ट फ्रेंड आहे.

2 / 6
दरम्यान, माही विजचे नाव नदीम नाजशी जोडले जात असल्याने माहीची मैत्रीण असलेली अंकिता लोखंडे चांगलीच भडकली आहे. तिने माही विजच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करत ट्रोलर्सना चांगलेच सुनावले आहे.

3 / 6
तसेच माही विजचे नाव नदीमशी जोडले जात आहे. परंतु ते चुकीचे आहे, असेही अंकिताने सांगितले आहे. काही दिवसापूर्वी नदीम नाजच्या वाढदिवसाचे निमित्त साधत माही विजने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर एक पोस्ट केली होती.

4 / 6
या पोस्टमध्ये नदीम हा माझा बेस्ट फ्रेंड आहे, असे माही म्हणाली होती. तेव्हापासूनच नेटकरी, ट्रोलर्स माही विजचे नाव नदीमशी जोडत होते. त्यानंतर आता अंकिता लोखंडेने समोर येत मोठी पोस्ट केली असून ती चांगलीच भडकली  आहे.

5 / 6
अंकिता लोखंडेने 11 जानेवारी रोजी इन्स्टाग्राम स्टोरीवर माही विज आणि नदीम यांच्या नात्याविषयी भाष्य केले आहे. या दोघांचे नाव एकमेकांशी जोडले जात असून त्या अफवा आहेत, असे अंकिता म्हणाली आहे. तसेच नदीम माही आणि जय भानुशाली यांच्यासाठी नेहमीच एका वडिलासारखा राहिलेला आहे, असे अंकिताने म्हटले आहे.

6 / 6
अंकिता लोखंडे ट्रोलर्सवर नाराज झाल आहे. काहीही माहिती नसताना एकाद्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणे चुकीचे आहे, असे अंकिता म्हणाली आहे. तसेच माही आणि जय यांच्या को पॅरेंटिंगचे अंकिताने कौतुक केले आहे. माही आणि जय यांना एक मुलगी आहे.