लग्नाची बोलणी पक्की? 19 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडसोबत मलायका पोहोचली आईच्या भेटीला, चर्चांना उधाण

अभिनेत्री मलायका अरोरा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हिरे व्यापारी हर्ष मेहतासोबत ती तिच्या आईच्या घरी भेटीला गेली होती. हा व्हिडीओ व्हायरल होताच दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

| Updated on: May 21, 2026 | 3:38 PM
1 / 5
अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या आयुष्यातील प्रत्येक लहानमोठी गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. विशेषत: मलायकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यात चाहत्यांना रस आहे. बुधवारी रात्री मलायका मुंबईत तिच्या आईच्या घरी भेटीला गेली होती. यावेळी मलायका जर एकटीच असती तर कदाचित हा चर्चेचा एवढा मोठा विषय बनला नसता, पण तिच्यासोबत एक खास व्यक्ती दिसल्याने हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

2 / 5
अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर मलायका अरोरा ही अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत होती. या दोघांचं प्रेम कोणापासूनच लपून राहिलं नव्हतं. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर मलायका आणि अर्जुन यांचं ब्रेकअप झालं. आता अर्जुनसोबत ब्रेकअपनंतर मलायकाच्या आयुष्यात पुन्हा नवीन प्रेम परतलं आहे. हिरे व्यापारी हर्ष मेहताला ती डेट करत असल्याचं समजतंय.

3 / 5
याआधी हर्ष आणि मलायकाच्या फक्त अफेअरच्या चर्चा होत्या, पण आता हे दोघं प्रत्येकवेळी एकत्र दिसत आहेत. मलायकाने त्याच्यासोबत राजस्थानमधील प्रसिद्ध मंदिरालाही भेट दिली होती. आता जेव्हा मलायका हर्षसोबत तिच्या आईच्या घरी पोहोचली, तेव्हा या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं.

4 / 5
20 मे रोजी मलायका सलवार सूटमध्ये तिच्या आईच्या घरी पोहोचली होती. यावेळी ती कॅमेऱ्यांपासून दूर राहिली, पण हर्ष मात्र तिच्या मागोमाग घरी जाताना दिसला. मलायका आणि हर्ष त्यांच्या नात्यात पुढे जाण्याचा विचार करत आहेत का, असा प्रश्न नेटकरी हा व्हिडीओ पाहून विचारत आहेत.

5 / 5
हर्ष हा मलायकापेक्षा 12 किंवा 13 वर्षांनी नाही तर तब्बल 19 वर्षांनी लहान आहे. तो सध्या 33 वर्षांचा असून मलायका 52 वर्षांची आहे. हर्ष मेहता हा एक डायमंड मर्चंट असून हर्ष सैंकस मॅनेजमेंट कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. तो प्रसिद्ध बिझनेसमॅन आहे. त्याच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असून त्याचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही.

Follow Us