इमरान हाश्मीपेक्षा सापच बेस्ट..; सिनेमात सापाला किस केल्यानंतर अभिनेत्रीचं वक्तव्य, कोण आहे ती?
एका चित्रपटातील सापासोबतच्या रोमँटिक सीनमुळे अभिनेत्री चांगलीच चर्चेत आली होती. या सीननंतर तिने केलेल्या वक्तव्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. नेमकं काय म्हणाली होती ही अभिनेत्री आणि या वक्तव्यामागे काय आहे किस्सा? जाणून घ्या सविस्तर.

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत तिच्या बोल्ड भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. तिच्या ‘हिस्स’ या चित्रपटात सापासोबतचे रोमँटिक दृश्य दाखवण्यात आले होते.
मल्लिका शेरावत आणि इमरान हाशमी यांची जोडी ‘मर्डर’ चित्रपटामुळे प्रचंड लोकप्रिय झाली होती. चित्रपटातील त्यांच्या रोमँटिक दृश्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.
‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात इमरान हाशमीला त्याच्या सर्वोत्तम आणि सर्वात खराब किसिंग सीनबद्दल विचारण्यात आले होते. त्याने मल्लिकासोबतचा सीन खराब असल्याचे सांगितल्याने मोठी चर्चा रंगली होती.
इमरानच्या वक्तव्याला उत्तर देताना मल्लिकाने ‘हिस्स’ चित्रपटाचा संदर्भ दिला होता. सापासोबतचा किसिंग सीन इमरानसोबतच्या सीनपेक्षा चांगला असल्याचे विधान तिने केले होते.
मल्लिकाने एका मुलाखतीत इमरानसोबतच्या जुन्या वादावर भाष्य केले होते. दोघांमधील गैरसमजामुळे त्यांचे बोलणे बंद झाले होते, अशी आठवण तिने सांगितली होती.
मागे वळून पाहताना हा वाद बालिशपणाचा होता, असे मल्लिकाने मान्य केले होते. इमरानचे कौतुक करताना तिने त्याला चांगला सहकलाकार आणि मदत करणारा माणूस असल्याचेही सांगितले होते.