प्रेमाच्या नादात रक्ताचा सडा, भयानक मर्डरने महाराष्ट्र हादरला, तरुणावर थेट…

सध्या नांदेड जिल्ह्यात सर्वांनाच हादरून टाकणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमसंबंध आणि वादातून एका तरुणाचा गोळ्या घालून खून करण्यात आला आहे.

Updated on: Nov 27, 2025 | 9:55 PM
1 / 6
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत  आहे. खून, दरोडा, विनयभंग, बलात्कारासारखी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची  भावना व्यक्त होत आहे.

2 / 6
असे असतानाच आता नांदेड जिल्ह्यात एक हादरवणारी घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नांदेडच्या इतवार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे.

3 / 6
प्राथमिक माहितीनुसार या तरुणाचे नाव सक्षम तोटे असून त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. गोळ्या झाडून नंतर त्याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

4 / 6
नांदेड शहरातील मिलिंद नगर भागातील पैलवान टी हाऊसच्या पाठीमागे ही भयानक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनसार खून करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे.

5 / 6
मयत सक्षम तोटे आणि दोन्ही आरोपी हे एकमेकांना ओळखत होते. मृत तरुण आणि आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना तत्काळ बेड्या ठोकल्या आहेत.

6 / 6
हा खून नेमका का करण्यात आला, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र प्रेम संबंध आणि त्यातून निर्माण झालेल्या वादातून हा खून झाला आहे, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.