Manoj Jarnage Patil : पाटील, पाटील, पाटील, नारायण गडावर संघर्ष योद्धा येताच मराठ्यांचा एकच जल्लोष
Manoj Jarnage Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा नारायणगडावर दसरा मेळावा सुरु झाला आहे. या मेळाव्यासाठी मराठा बांधव मोठ्या संख्येने नारायण गडावर आले आहेत. मराठा समाज बांधवाना मनोज जरांगे पाटील संबोधित करत आहेत.

नारायण गडावरून मराठा आरक्षण आंदोलनाला नवी दिशा मिळणार का? आणि जरांगे कोणती भूमिका स्पष्ट करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नारायण गडावर मोठ्या संख्येने मराठे जमले आहेत.
नारायण गडावरील दसरा मेळावा याकडे केवळ मराठा समाजाचाच नव्हे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याला शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध आहे.
समाज आणि समाजाची लेकरं बाळं महत्वाची आहेत. महाराष्ट्रात मराठा समाज उन्हातान्हात लढतोय. भान ठेवा. कोणाच्या शब्दाला किती किंमत द्यायची, कोणाचं किती ऐकायचं, काय शब्द प्रयोग होतो, त्या शब्दाचा अर्थ काय हे समजून घ्या, असं मनोज जरांगे पाटील बोलले.
लोकांचं जीवन चाललय पक्ष आणि नेता मोठा करण्यासाठी. तुमचा आमचा जीव चाललाय समाजाची प्रतिष्ठा मोठी करण्यासाठी. संकट आल्यानंतर कोणत्याही पक्षातला मराठा नेता असू द्या, त्याच्यावर संकट आलं, तर त्या संकटावर पांघरुण घालणारा मराठा समाज असतो असं मनोज जरांगे पाटील बोलले.
मराठा समजाने सोडलं तर जेलमध्ये जावं लागेल. आधी समाज मोठा झाला पाहिजे. समाज बरबाद झाला, तर तुम्ही आम्ही उद्धवस्त व्हायला वेळ लागणार नाही. ही झुंज कशासाठी, हा आक्रोश कशासाठी चालल आहे. समाज मोठा व्हावा म्हणून असं मनोज जरांगे पाटील बोलले.