
तुम्हाला मोराची डिझाईन माहित आहे का? ही डिझाईन एकदम सोपी असते. या डिझाईनची मेहंदी काढल्यावर हात भरल्यासारखा वाटतो. मोराच्या डिझाईनची मेहंदी खूप सुंदर दिसते. करावा चौथला तुमचे हात खूप छान दिसतील तुम्ही अशी डिझाईन हातावर काढू शकता.

मंडला डिझाईन नेहमीच ट्रेंडमध्ये असतात. ही डिझाईन काढणे सुद्धा खूप सोपे असते. तुमच्या तळहातावर आणि मागील बाजूस तुम्ही मंडला डिझाईन काढू शकता. ही मेहंदी रंगल्यावर देखील खूप सुंदर दिसते.

तुम्हाला मेहंदी काढताच येत नसेल, खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही फुले, वेली अशा डिझाईन काढू शकता. या डिझाईन तर कायमच ट्रेंडिंग असतात. या डिझाईनमुळे कमी कष्टात तुमचा हात भरलेला दिसेल, सुंदर दिसेल.

स्टफ्ड डिझाइन नावाचा प्रकार असतो. स्टफ्ड डिझाइन काढली की तुमचा हात भरल्यासारखा दिसतो. यात तुम्ही प्रत्येक डिझाईन मध्ये रंग भरू शकता. म्हणजे काय? डिझाईन भरायचे, गडद करायचे आणि मग ती मेहंदी रंगल्यावर खूप सुंदर दिसते.

तुम्ही हातावर मंडला काढली की त्यासोबतच तुम्ही वेली, फुले किंवा जाळीची डिझाईन काढू शकता. हात भरल्यासारखा आणि सुंदर वाटेल. हाताच्या मागच्या बाजूला सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता.