Mumbai Air Pollution : उकाडा वाढला अन् आता हवेची गुणवत्ता खालावली; मुंबईकरांची चिंता वाढवणारी आकडेवारी समोर

ऐन सणासुदीच्या दिवसांत मुंबईकरांची चिंता वाढणार आहे. कारण यावर्षी पावसाने लवकरच काढता पाय घेतला आहे. आणि यामुळे मुंबईत ऑक्टोबरच्या उकाड्याने कहर केला आहे. नागरिकांचे गर्मीने हाल होत आहेत. आणि त्यातच आता मुंबईची हवा कमालीची प्रदूषित झाली आहे. मुंबईच्या हवेत प्रदूषणाचा विळखा हा वाढतच चालला आहे. त्यामुळे देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये मुंबईचा समावेश आहे असे सांगितले जाते. हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नेमकी आकडेवाडी किती आहे जाणून घ्यायचं असेल तर पुढील माहिती जरूर वाचा.

| Updated on: Oct 18, 2026 | 9:35 AM
1 / 5
ऐन सणासुदीच्या दिवसांत मुंबईकरांची चिंता वाढणार आहे. कारण यावर्षी पावसाने लवकरच काढता पाय घेतला आहे. आणि यामुळे  मुंबईत ऑक्टोबरच्या उकाड्याने कहर केला आहे. नागरिकांचे गर्मीने हाल होत आहेत. आणि त्यातच आता मुंबईची हवा कमालीची प्रदूषित झाली आहे.

ऐन सणासुदीच्या दिवसांत मुंबईकरांची चिंता वाढणार आहे. कारण यावर्षी पावसाने लवकरच काढता पाय घेतला आहे. आणि यामुळे मुंबईत ऑक्टोबरच्या उकाड्याने कहर केला आहे. नागरिकांचे गर्मीने हाल होत आहेत. आणि त्यातच आता मुंबईची हवा कमालीची प्रदूषित झाली आहे.

2 / 5

मुंबईच्या हवेत प्रदूषणाचा विळखा हा वाढतच चालला आहे. त्यामुळे देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये मुंबईचा समावेश आहे असे सांगितले जाते. हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आधीच गर्मीने हैराण नागरिक आणि आता त्यांना प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे.

3 / 5

त्याचबरोबर मुंबईत सकाळच्या वेळेस देखील मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण दिसून येतंय. याचा परिणाम थेट हवेच्या गुणवत्तेवर होतो. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी मिळालेल्या आकडेवारीनुसार, मुंबईचा AQI 190 नोंदवण्यात आला आहे. मात्र, वेगवेगळ्या मॉनिटरिंग यंत्रणांनुसार आकडेवारीत फरक दिसून येतोय असे सांगितले जात आहे.

4 / 5

मात्र हे प्रदूषण एवढ्या मोठ्या प्रमाणात होण्याचे कारण म्हणजे शहरातील वाढत्या बांधकामांची धूळ, मेट्रो आणि बुलेट ट्रेनसारख्या पायाभूत प्रकल्पांची कामे, वाहनांमधून बाहेर पडणारा धूर आणि कचरा जाळण्यामुळे निर्माण होणारे प्रदूषक ही प्रमुख कारणे आहेत. अजून एक कारण म्हणजे पावसाळा संपल्यानंतर वाऱ्याचा वेग कमी होतो आणि हवेत प्रदूषक साचून राहतात यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होते.

5 / 5

हवेतील PM2.5 आणि PM10 या सूक्ष्मकणांचे वाढलेले प्रमाण चिंताजनक असतात. ह्या प्रदूषित हवेमुळे श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता आहे. मात्र अशावेळी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच ह्यावर सरकार आता काय तोडगा काढते ते पाहणे देखील तितकंच महत्वाचं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us