Photo : धिंगाणा… मुंबईत पावसाची दमदार हजेरी, वाहतूक कोंडी; चाकरमान्यांचे हाल

मुंबईत मान्सूनचे दमदार आगमन झाले आहे. मध्य मुंबईतील लोअर परळ आणि सेनापती बापट मार्गावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू होती, ज्यामुळे चाकरमान्यांची तारांबळ उडाली. वाहनचालकांना काळजीपूर्वक प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील विविध भागांतही पावसाची जोरदार हजेरी लागली आहे.

| Updated on: Jun 23, 2026 | 11:29 AM
1 / 7
अनेक महिने प्रचंड उकाडा सहन केल्यानंतर आणि वरूणाराजाची चातकाप्रमाणे वाट पाहिल्यानंतर अखेर मुंबईकरांना पावसाने थोडासा दिलासा दिला आहे. मंगळवारी काळी मुंबईतील विविध भागांत पावसाने हजेरी लावली. अचानक सरी कोसळू लागल्यामुळे कामावर निघालेले, शाळेत जाणारे, सर्वसामान्य नागरिक, मुलं यांची त्रेधातिरपीट उडाली खरी... पण पाऊस आणि त्यापाठोपाठ आलेला गारवा यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर हास्यही उमललं.

अनेक महिने प्रचंड उकाडा सहन केल्यानंतर आणि वरूणाराजाची चातकाप्रमाणे वाट पाहिल्यानंतर अखेर मुंबईकरांना पावसाने थोडासा दिलासा दिला आहे. मंगळवारी काळी मुंबईतील विविध भागांत पावसाने हजेरी लावली. अचानक सरी कोसळू लागल्यामुळे कामावर निघालेले, शाळेत जाणारे, सर्वसामान्य नागरिक, मुलं यांची त्रेधातिरपीट उडाली खरी... पण पाऊस आणि त्यापाठोपाठ आलेला गारवा यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर हास्यही उमललं.

2 / 7

मुंबईत मान्सूनच्या आगमनासोबतच पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे. मध्य मुंबईतील आज जोरदार मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. अचानक सुरू झालेल्या या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले असून, चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे अनेक परिसरातील वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना थोडे हाल सहन करावे लागले.

3 / 7

अचानक सुरू झालेल्या या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले असून, चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पावसामुळे या परिसरातील वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. धुवांधार पावसामुळे दिवसाच काळोख निर्माण झाला होता. पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असून सुखद गारव्यामुळे वातावरणही प्रसन्न झालं होतं.

4 / 7

मुसळधार पावसामुळे सेनापती बापट मार्ग आणि परळच्या सखल भागांत काही प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना काळजीपूर्वक प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले. मुंबईतील वडाळा आरटीओ परिसरातही धुवांधार पाऊस झाला. त्यामुळे या परिसरात पाणी साचले होते. अवघ्या काही मिनिटातच रोडवर पाणी भरलं होतं.

5 / 7

मुसळधार पावसामुळे कांदिवली परिसरात दृश्यमानता कमी झाली. सकाळपासून इथे बराच वेळ पावसाच्या सरी कोसळत होत्या.

6 / 7

काळ्या ढगांच्या गर्दीनंतर दादरमध्ये पावसाचे आगमन झालं . दादरच्या शिवाजी पार्कातही जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली.

7 / 7

दरम्यान कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, गोरेगाव, दहिसरमध्ये मान्सून पुन्हा सक्रीय, कांदिवलीत जोरदार पाऊस झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us