J P Nadda at Lalbaugcha Raja 2023 : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा लालबागचा राजाच्या चरणी लीन
J P Nadda at Lalbaugcha Raja 2023 : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा लालबागचा राजाच्या चरणी नतमस्तक झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी जात गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना आणि भाजपचे इतर नेते उपस्थित होते. पाहा फोटो...

जे पी नड्डा यांनी आज लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. ते लालबागच्या राजासमोर नतमस्तक झाले. यावेळी देशातील जनतेला सुखी ठेव,असं साकडं त्यांनी घातलं.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज मुंबई दौऱ्यावर आहेत. आज सकाळी दहा वाजता त्यांचं मुंबई विमानतळावर आगमन झालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर भाजप नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं.

लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं तेव्हा भाजपचे नेते त्यांच्यासोबत होते. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांच्यासह इतर भाजपचे नेते पदाधिकारी तिथे होते.

गिरगावच्या केशवजी चाळ परिसरामध्ये जे पी नड्डा जी यांचं जल्लोषात स्वागत केलं. लेझिम खेळत त्यांचं स्वागत केलं गेलं. यावेळी अनेक मुंबईकर नागरिक उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षाचेजे पी नड्डा यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जात गणरायाचं दर्शन घेतलं. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार यांच्यासह अन्य भाजप आणि शिवसेनेचे नेते उपस्थित होते.