AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MHT-CET मध्ये मोठा स्कॅम, रोहित पवारांनी बाहेर काढलेल्या ऑडिओ क्लिपने खळबळ, थेट मंत्र्याचा राजीनामा मागितला

सीईटी परीक्षेच्या निकालात पैशांच्या जोरावर फेरफार होत असल्याचा आरोप करत रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत काही ऑडिओ क्लिप आणि शिक्षकांचे स्टिंग ऑपरेशन दाखवले. निकाल सेट करण्यासाठी 25 लाख रुपये मागितले जात असल्याचा शिक्षकांचा दावा त्यांनी मांडला. या प्रकरणात थेट एका बड्या मंत्र्यावर बोट ठेवत पवारांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

MHT-CET मध्ये मोठा स्कॅम, रोहित पवारांनी बाहेर काढलेल्या ऑडिओ क्लिपने खळबळ, थेट मंत्र्याचा राजीनामा मागितला
Rohit Pawar CET Scam AllegationsImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 03, 2026 | 8:05 PM
Share

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. CET चे निकाल पैसे घेवून सेट केल जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. शिक्षकांनी केलेलं स्टिंग आँपरेशन दाखवत रोहित पवारांनी हे आरोप केले आहेत. पुण्यातील एका संस्थेकडून सीईटीचे निकाल सेट होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. शिंगांरे नावांच्या शिक्षकांनी पुण्यातील संस्थेचं स्टिंग आँपरेशन केलं असल्याची माहिती त्यांनी दिली. 50 हजार रूपये निकाल सेट करण्यासाठी दिल्याचा शिक्षकांचा दावा आहे.

यामध्ये निकाल सेट करून देण्यासाठी मागितले जातात 25 लाख रूपये, अशा प्रकारचा शिक्षकांचा खळबळजनक दावा आहे. भाजपचे विक्रम पाचपुतेंची आॉडिओ क्लिपही रोहित पवारांनी यावेळी ऐकवली आहे. मुख्यमंत्र्यांनाही सीईटीतील गैरव्यवहारांची माहिती असल्याचं त्यांनी सांगितलं, एका पालकांची ऑडीओ क्लिप रोहित पवारांनी ऐकवली. दरम्यान, एसआयटी स्थापन करून काहीही होणार नाही ,असा पालकांनी दावा केला. एज्युस्पार्क कंपनीत 2300 कोटीचा भष्ट्राचार झाला असून शिक्षक शिंगांरे यांनी केलं स्टिंग आँपरेशन.

चंद्रकांत पाटलांच्या विभागातील एक जण मॅनेज करतोय हे सगळं. उद्या त्यांचं नाव ट्विटरवर जाहीर करणार असंही यावेळी रोहित पवार म्हणाले आहेत. 2023 पासूनच्या निकालांची ऑडिट करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांच्या राठोड नावाच्या पीएला एक पालक भेटलेय देवेद्र फडणवीसांच्या पीएशी बोललो होतो, ते प्रकरण दाबल जाणार असं आम्हाला पीएनी सांगितलं, असं म्हटलं आहे. जास्त मोठं होवून देणार नाही, असं राठोड यांनी सांगितल्याचं म्हटलं आहे. चंद्रकांत पाटलांना मुख्यमंत्री साहेबांनी घालवावं, त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी यावेळी आमदार रोहित पवारांनी केली आहे. रोहित पवारांनी याबद्दल एक पोस्टही सोशल मीडियावरुन शेअर केली आहे.

रोहित पवारांची पोस्ट जशास तशी

सीईटी सेल हा कसा भ्रष्टाचाराचा सेल झाला आणि या सेलच्या माध्यमातून लाखो रुपये घेऊन विद्यार्थ्यांना कसे प्रवेश दिले जातात याचं प्रामाणिक शिक्षक मंडळींनी केलेलं स्टींग ऑपरेशन PPT च्या माध्यमातून मुंबईत पत्रकार परिषदेत दाखवलं.  यामध्ये टेंडर कसे मॅनेज केले जातात, पैसे घेऊन ऍडमिशन करून देण्याची खात्री कशी दिली जाते, सेंटर कसे मॅनेज केले जातात, या बाबी सविस्तर दाखवण्यात आल्या आहेत. हे संपूर्ण प्रेझेंटेशन पत्रकार, अभ्यासक, विद्यार्थी आणि पालक यांच्या माहितीसाठी मी पुढील लिंकमध्ये देत आहे.

यामध्ये विशेष गंभीर बाब म्हणजे सत्ताधारी पक्षाचा एक आमदार या सर्व बाबी मुख्यमंत्री यांनाही अवगत असल्याचं सांगत असल्याची ऑडिओ क्लिप आहे. भ्रष्टाचाराची ही कीड आज काढली नाही तर उद्या केवळ पैसेवाल्या विद्यार्थ्यांनाच ऍडमिशन मिळेल आणि गुणवत्ता असलेले विद्यार्थी यामधून डावलले जाण्याचा धोका आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराची ही कीड आत्ताच काढावी लागेल त्यासाठी या सर्व प्रकरणाची निवृत्त न्यायमूर्तींच्या माध्यमातून न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक, विवेक फणसाळकर साहेब, प्रवीण गेडाम साहेब या किंवा यांच्यासारख्या प्रामाणिक व्यक्तिमत्त्वांच्या समावेश असलेली न्यायालयीन चौकशी समिती नेमून मुख्यमंत्री महोदयांनी या सर्व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी आणि या सर्व प्रकरणाला जबाबदार म्हणून उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा राजीनामा घ्यावा. या प्रश्नी आम्ही कुठलही राजकारण करत नाही, त्यामुळं सरकारनेही ते करू नये.

Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले