उन्हामुळे गाईंची तब्येत बिघडली; फॉगर बसवत शेतकऱ्याचा तापमान नियंत्रणाचा अनोखा प्रयोग…

Nashik : नाशिकच्या लासलगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर आहे, यामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. आता एका शेतकऱ्याने फॉगर बसवून तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे.

बापू गायकवाड | Updated on: Apr 29, 2026 | 9:49 PM
1 / 5
नाशिक जिल्ह्यासह राज्यामध्ये उष्णतेची लाट आल्याने उन्हाच्या कडाक्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे थंडीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातही यंदा कमाल तापमान वाढले आहे.

नाशिक जिल्ह्यासह राज्यामध्ये उष्णतेची लाट आल्याने उन्हाच्या कडाक्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे थंडीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातही यंदा कमाल तापमान वाढले आहे.

2 / 5

गेल्या 13 एप्रिल पासून आजपर्यंत तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वरती कायम आहे, त्यामुळे माणसांसह जनावरांवरही त्याचा परिणाम होताना पहायला मिळत आहे.

3 / 5

लासलगाव येथील शेतकरी प्रमोद पाटील यांच्या गाईंची तब्येत उष्णतेमुळे खालावली होती त्यामुळे दुध उत्पादनातही घट झाली होती. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला.

4 / 5

वाढत्या तापमानामुळे गोठ्यातील वातावरण अधिक गरम होत असल्याने त्यांनी गाईंसाठी विशेष उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला, गोठ्यातील तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रमोद पाटील यांनी सुमारे 7 हजार रुपये खर्च करून पाण्याचे 16 फॉगर (स्प्रे) बसवले आहेत.

5 / 5

या फॉगरमुळे गोठ्यात थंडावा निर्माण होत असून तापमान कमी ठेवण्यास मोठी मदत होत आहे, त्यामुळे गाईंच्या तब्येतीत सुधारणा झाली असून दुध उत्पादनही पुन्हा वाढल्याचे समोर आले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us