AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून संजय राऊत बाळासाहेबांना आवडत नव्हते, राज ठाकरेंनी सांगितला तो किस्सा

संजय राऊत यांच्या बोध कीर्तन पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील उपस्थिती होती, या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी हा किस्सा सांगितला आहे.

...म्हणून संजय राऊत बाळासाहेबांना आवडत नव्हते, राज ठाकरेंनी सांगितला तो किस्सा
Raj ThackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 31, 2026 | 7:37 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या बोध कीर्तन पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील उपस्थिती होती, या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यासोबतच्या आपल्या जुन्या आठवणींना उजाळाला दिला. संजय राऊत यांच्यासोबतचे माझे संबंध अतिशय जुने आहेत. दिलीप ठाकूर आणि संजय राऊत माझ्या वडिलांकडे तासंतास बसायचे. माझ्या वडिलांच्या शिव्याही त्यांनी खाल्ल्या आहेत. संजय राऊतांचा पहिला संबंध माझ्या वडिलांसोबत आला, मग बाळासाहेबांसोबत, असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं.

पुढे बोलताना राज ठाकरे यांनी म्हटलं की, संजय राऊत त्यावेळी लोकप्रभाला होते. त्यावेळी मी 1986-88 ला मार्मिकला व्यंगचित्र काढत होतो. लोकसत्तालाही मी माझी व्यंगचित्र घेऊन जायचो. तेव्हा लोकसत्ताला माधव गडकरी संपादक होते. संजय राऊत त्यावेळी गँगवारच्या कथा लिहण्यासाठी प्रसिद्ध होते. ते लोक प्रभाला गँगवॉरच्या कथा लिहत होते. त्याचवेळी 1986-88 च्या दरम्यान सामना आला. आमची चांगलीच मैत्री होती. त्यावेळेला असंही बोलणं चालायचं की बाळासाहेबांच्या वर्तमान पत्राला अशी भाषा शोभते का?  शिवसेनेच्या विरोधात अनेक लेख राऊतांनी लिहिले होते, त्यामुळेच बाळासाहेबांना संजय राऊत आवडत नव्हते.

त्यावेळी संजय राऊत यांनी मला विचारलं,  बाळासाहेब प्रभाला मुलाखत देतील का? त्यावेळी मी  म्हंटलं तुझी चांगली इमेज आहे (मार्मिकपणे) संजय़ राऊतांनी त्यावेळी मुलाखतीत वेडे वाकडे प्रश्न विचारले, मग काय बाळासाहेबांनी चालू मुलाखतीमध्ये शिव्या हसडल्या.  ती मुलाखत शिव्यांसह प्रसिद्ध झाली,  त्यानंतर बाळासाहेबांची भावना होती बंदे मे दम है. जो माणूस स्वत:च्या शिव्या देखील मुलखतीमध्ये प्रसिद्ध करू शकतो.  त्यानंतर 1992 ला बाळासाहेबांना मी सांगितलं हा चांगला लिहितो,  आणि संजय राऊत त्याच वर्षी सामनाचे संपादक झाले. बोधनकरांपासून सुरु झालेला प्रवास बोध किर्तनापर्यंत येईल असं वाटलं नाही, असंही यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा