AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Story : लग्नच केलं नाही तर म्हातारपणी कोण सांभाळणार? जगातल्या सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सापडलं, चकित व्हाल

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा निर्णय असतो. लग्न करायचं नाही म्हटलं की, अनेकांवर अनेक प्रश्नांचा भडीमार केला जातो. एकट्याने आयुष्य काढणं कठीण आहे. पण या प्रश्नाचं उत्तर तज्ञ काय देतात? चला तर मग जाणून घेऊयात...

Special Story : लग्नच केलं नाही तर म्हातारपणी कोण सांभाळणार? जगातल्या सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सापडलं, चकित व्हाल
life without marriageImage Credit source: social media
| Updated on: Oct 31, 2026 | 6:57 PM
Share

लग्न करायचं की नाही, हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो. काही जण योग्य जोडीदार मिळत नसल्यामुळे लग्न टाळतात, तर काहींना लग्नाच्या जबाबदाऱ्या नको असतात. काही जणांना एकट्याने आयुष्य जगायला आवडतं. मात्र, अशा लोकांना अनेकदा एक प्रश्न विचारला जातो. तो म्हणजे, लग्न केलं नाही तर म्हातारपणी तुमची काळजी कोण घेणार? हा प्रश्न अनेकांना विचार करायला भाग पाडतो.

लग्न केलं नाही तर म्हातारपणी काय होणार?

तुमचं लग्नाचं वय झालं असेल आणि तरीही तुम्ही लग्न करण्यास तयार नसाल, तर घरातील आई-वडील, नातेवाईक किंवा मित्र तुम्हाला लग्नाचा सल्ला देताना दिसतात. सध्या तुम्हाला एकटं राहणं आवडत असेल, स्वतःच्या मर्जीने आयुष्य जगता येत असेल. कोणाच्याही जबाबदाऱ्या नसल्यामुळे तुम्ही आनंदीही असाल. मात्र, वय वाढल्यानंतर परिस्थिती बदलेल, असं सांगून अनेक जण लग्न करण्यासाठी दबाव टाकतात.

आजारपणात कोण देणार साथ?

वय वाढलं की शरीराची ताकद कमी होऊ शकते. वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी दैनंदिन कामांसाठी दुसऱ्या व्यक्तीची मदत घ्यावी लागू शकते. त्यामुळे लग्न न करण्याचा निर्णय घेतलेल्या व्यक्तीला भविष्यातील आयुष्याबाबत प्रश्न विचारले जातात. आज तुमच्यासोबत मित्र असतील, कामात व्यस्त असाल आणि आयुष्य व्यवस्थित सुरू असेल. पण पुढे आजारपण आलं किंवा मदतीची गरज भासली, तर तुमची काळजी कोण घेईल, असा प्रश्न उपस्थित केला जातो.

म्हातारपणी आनंदी राहण्यासाठी लग्न गरजेचं आहे का?

मात्र, म्हातारपणी काळजी घेण्यासाठी लग्न करणं हाच एकमेव पर्याय आहे का, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. लग्न झालेल्या प्रत्येक व्यक्तीला जोडीदाराची साथ मिळेलच असं नाही. त्याचप्रमाणे लग्न न केलेल्या व्यक्तीला आयुष्यात एकटेपणा जाणवेलच, असंही नाही. मित्र, नातेवाईक आणि जवळच्या लोकांशी चांगले संबंध ठेवणं महत्त्वाचं ठरू शकतं. त्यामुळे लग्नाचा निर्णय घेताना केवळ म्हातारपणी कोण काळजी घेईल, या भीतीने निर्णय घेण्याऐवजी स्वतःची इच्छा आणि भविष्यातील नियोजन यांचा विचार करणं गरजेचं आहे.

Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा