AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होय व्होट चोरीमध्ये तथ्य, सर्वात आधी…भाजपा नेत्याच्या विधानाने खळबळ, नेहरूंचे नाव घेत मोठा दावा!

सरदार पटेल यांना पंतप्रधानपदापासून दूर ठेवण्यात आलं. त्यांना अपमानित करण्यात आलं. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सरदार पटेल यांच्या नावाला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पसंती दिली होती, असा खळबळजनक दावा भाजपाचे संबित पात्रा यांनी केलाय.

होय व्होट चोरीमध्ये तथ्य, सर्वात आधी...भाजपा नेत्याच्या विधानाने खळबळ, नेहरूंचे नाव घेत मोठा दावा!
pandit nehru and bjpImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 31, 2026 | 6:59 PM
Share

Pandit Nehru : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक एकवटले आहेत. काँग्रेसने येत्या 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीत मोठ्या आंदोलनाची घोषणा केली असून या आंदोलनात लोकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. एकीकडे या आंदोलनाची चर्चा होत असताना दुसरीकडे विरोधी इंडिया आघाडीने दिल्लीत आज (31 ऑक्टोबर) प्रतिसंसद आयोजित करून सरकारला घेरलं. या प्रतिसंसदेत सरकारवर व्होट चोरीचे गंभीर आरोप करण्यात आले. दरम्यान, काँग्रेस तसेच विरोधकांच्या याच आरोपांना भाजपाने प्रत्युत्तर दिलंय. विशेष म्हणजे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच पहिल्यांदा मतांची चोरी केली, असा गंभीर आरोप भाजपाने केलाय.

मतांच चोरी झाली, विरोधक, काँग्रेसचा दावा

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या निवासस्थानी विरोधकांनी प्रतिसंसदेचे आयोजन केले. यावेळी विरोधकांनी रानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच देशात मतांची मोठ्या प्रमाणात चोरी करण्यात आली, असा दावा करण्यात आला. सोबतच एसआयआर प्रक्रियेवरही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. यालाच भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांच्या दाव्यांनी एकच खळबळ उडाली आहे.

संबित पात्रा यांचा नेमका दावा काय?

देशाच्या पहिल्या पंतप्रधानांच्या निवडीवेळीच मतांची चोर झाली, असं पात्रा म्हणाले. “होय मतांच्या चोरीमध्ये तथ्य आहे. मतचोरी झाली होती. आज 31 ऑक्टोबर आहे. आज सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. देशात पहिली मतांची चोरी गांधी घराण्यातील सदस्य पंडित नेहरू यांनीच केली. काँग्रेसच्या नेत्यांची मतं त्यांनी चोरूनच नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाले,” असा मोठा दावा पात्रा यांनी यावेळी केला.

सरदार पटेल यांना बाजूला सारून…

सरदार पटेल यांना पंतप्रधानपदापासून दूर ठेवण्यात आलं. त्यांना अपमानित करण्यात आलं. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सरदार पटेल यांच्या नावाला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पसंती दिली होती. तरीदेखील पटेल यांना बाजूला सारून नेहरू यांना देशाचे पंतप्रधान बनवण्यात आले, असेही पात्रा यावेळी म्हणाले. दरम्यान आता पात्रा यांच्या या दाव्याला काँग्रेस नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा