स्वीट मार्टमध्ये चक्क बुरशी लागलेली रसमलाई, ग्राहकांमध्ये मोठा संताप; नवी मुंबईत धक्कादायक प्रकार समोर!

नवी मुंबईतील कामोठे सेक्टर-२५ येथील दुकानात ग्राहकाला खराब आणि बुरशी लागलेली रसमलाई विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महत्वाचं म्हणजे उपस्थित असलेल्या नागरिकांनीदेखील हे खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर संताप व्यक्त केला.

| Updated on: Sep 13, 2026 | 7:37 PM
1 / 5
नवी मुंबई : कामोठे येथील बिकानेरमध्ये बुरशी लागलेल्या रसमलाई विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार समोर येताच दुकान मालकाने चूक मान्य करत माफी मागितली आहे.

नवी मुंबई : कामोठे येथील बिकानेरमध्ये बुरशी लागलेल्या रसमलाई विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार समोर येताच दुकान मालकाने चूक मान्य करत माफी मागितली आहे.

2 / 5

नवी मुंबईतील कामोठे सेक्टर-२५ येथील दुकानात ग्राहकाला खराब आणि बुरशी लागलेली रसमलाई विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महत्वाचं म्हणजे उपस्थित असलेल्या नागरिकांनीदेखील हे खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर संताप व्यक्त केला.

3 / 5

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अक्षय देवकर यांनी दुकानातून रसमलाई खरेदी केली. मात्र घरी आणल्यानंतर रसमलाई खराब झाल्याचे आणि त्यावर बुरशी लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आल या प्रकाराची माहिती दुकान मालकाला दिल्यानंतर संबंधित मालकाने रसमलाई खराब असल्याचे मान्य करत माफी मागितली.

4 / 5

दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात नागरिक मोठ्या प्रमाणात मिठाई आणि खाद्यपदार्थांची खरेदी करत असताना अशा प्रकारे खराब खाद्यपदार्थांची विक्री होणे हा नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रकार असल्याने घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त केला.

5 / 5

या प्रकरणाची अन्नसुरक्षा विभागाने तातडीने दखल घेऊन संबंधित दुकानाची तपासणी करावी, खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची पाहणी करावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे..

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us