आई-वडिलांना वाटलं लेक वारला, पण तो थेट… 500 हुन अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्याला ओळखलं का?

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयासोबतच खऱ्या आयुष्यातही धाडसी कामगिरी केली. यापैकी एका अष्टपैलु अभिनेत्याचं कौतुक नेहमीच केलं जातं. त्यांनी चित्रपटांमध्ये सहकलाकाराची भूमिका केली असली तर ती प्रत्येकाच्या मनात घर करेल अशी होती. अभिनेते नजीर हुसैन हे अशा व्यक्तिमत्वापैकी एक आहेत. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या नजीर हुसैन यांना तुरुंगवास आणि फाशीची शिक्षाही सुनावण्यांत आली होती. पुढे त्यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

| Updated on: Sep 17, 2026 | 8:41 PM
1 / 5
नजीर हुसैन यांचा जन्म 15 मे 1922 रोजी उत्तर प्रदेशातील उसिया गावात झाला. त्यांचे वडील शहबाज खान भारतीय रेल्वेत गार्ड होते. वडिलांच्या शिफारशीमुळे नजीर यांना रेल्वेत फायरमनची नोकरी मिळाली. मात्र, काही महिन्यांतच त्यांनी नोकरी सोडून ब्रिटिश आर्मीमध्ये प्रवेश केला.

नजीर हुसैन यांचा जन्म 15 मे 1922 रोजी उत्तर प्रदेशातील उसिया गावात झाला. त्यांचे वडील शहबाज खान भारतीय रेल्वेत गार्ड होते. वडिलांच्या शिफारशीमुळे नजीर यांना रेल्वेत फायरमनची नोकरी मिळाली. मात्र, काही महिन्यांतच त्यांनी नोकरी सोडून ब्रिटिश आर्मीमध्ये प्रवेश केला.

2 / 5

naajir दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांची सिंगापूर आणि मलेशियात नियुक्ती झाली. युद्धादरम्यान त्यांना बंदी बनवण्यात आले आणि मलेशियातील तुरुंगात ठेवण्यात आले. काही काळानंतर त्यांना भारतात पाठवण्यात आले.hussain

3 / 5

भारतामध्ये परतल्यानंतर नजीर हुसैन यांनी ब्रिटिश आर्मी सोडली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांनी प्रेरित होऊन ते आझाद हिंद फौजेत सहभागी झाले. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःला झोकून दिले.

4 / 5

ब्रिटिशविरोधी प्रचारामुळे त्यांना अटक झाली आणि फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. हावडा ते दिल्ली रेल्वेप्रवासात त्यांनी कागदावर आपली परिस्थिती लिहून दिलदारनगर जंक्शनजवळ खिडकीतून फेकला. या चिठ्ठीमुळे कुटुंबाला ते जिवंत असल्याचे समजले. देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांची सुटका झाली.

5 / 5

स्वातंत्र्यानंतर बिमल रॉय यांनी नजीर हुसैन यांना चित्रपटात काम करण्याची संधी दिली. परिणीता, मुसाफिर, अनुराधा, साहिब बीबी और गुलाम आणि कटी पतंग यांसारख्या चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांनी 500 हून अधिक चित्रपटांत काम केले आणि भोजपुरी सिनेमातही महत्त्वाचे स्थान मिळवले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us