Rohit Pawar : हात जोडतो मी..रोहित पवार पोलिसांना नडले, मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनच्या आत काय घडलं?
Rohit Pawar : मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनच्या आत रोहित पवार आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली. रोहित पवार तिथे DGCA विरोधात एफआयआर करण्यासाठी गेले होते. पोलीस स्टेशनच्या आत नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार आज दक्षिण मुंबतील मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. अजित पवार विमान अपघात प्रकरणात डीजीसीए विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी ते तिथे दोन्ही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत गेले होते.

त्यावेळी तिथे पोलीस अधिकाऱ्यांसोबत रोहित पवार यांची वादावादी झाली. आतमध्ये पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं? ते जाणून घेऊया. मरीन ड्राइव्हमध्ये एफआयआर नोंदवला नाही, तरी बारामतीमध्ये एफआयआर नोंदवू जो पर्यंत एफआयआर नोंदवणार नाही, तो पर्यंत ठिय्या मांडणार असा इशारा त्यांनी दिला होता.

एफआयआर नोंदवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. नवीन कायदा आहे. एखाद्या गुन्ह्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्यांचं अपघाती निधन झालं. अजितदादांबरोबर अजून चार लोक होते. हे सगळ्यांना माहित आहे असं रोहित पवार म्हणाले.

देशाचा एक नगारिक म्हणून मी एफआयआर करायला आलो. तिथे एक पीआय सीनियर उपस्थित होते. तिथे बोलताना वादावादी झाली. ज्यूनियर बोलला एफआयआर होऊ शकत नाही. प्रांजल नावाचा आमचा वकिल आहे, त्याने समजावून सांगितलं, एफआयआर कसा होऊ शकतो. कायदा काय आहे असं रोहित पवार म्हणाले.

एफआयआर नोंदवण्यासाठी तिथे लॅपटॉप आणलेला. तेवढ्यात एक मोठा अधिकारी तिथे आला. त्याने येऊन सांगितलं की, एफआयआर होणार नाही. मग, आम्ही विचारलं की का नाही होणार? ते म्हणाले नाही नोंदवणार एफआयआर. तुम्हाला जिथे जायचय तिथे जा असं म्हणाले. एफआयआर करणं आमचा अधिकार आहे. त्यांना वरुन कोणाचा फोन आला? एफआयआर नोंदवायला घेतली मग का कॅन्सल केली? असा सवाल रोहित पवार यांनी विचारला.