या शोमध्ये निर्मात्यांनी बाथरुममध्ये लावलेला कॅमेरा, स्पर्धकाचा व्हिडीओ झालेला लीक, बोल्ड अभिनेत्रीचा मोठा खुलासा

या प्रसिद्ध रिअॅलिटी शोमध्ये निर्मात्यांनी बाथरुममध्ये लावलेला कॅमेरा. एका स्पर्धकाचा व्हिडीओ झालेला व्हायरल. नेहल वडोलियाने सांगितला रिअॅलिटी शोमधील धक्कादायक प्रकार.

| Updated on: Jun 01, 2026 | 2:47 PM
1 / 6
टीव्ही आणि वेब सिरीजमधून ओळख मिळवलेली अभिनेत्री नेहल वडोलिया सध्या तिच्या धक्कादायक खुलाशांमुळे चर्चेत आहे. एका पॉडकास्ट मुलाखतीत तिने रिअॅलिटी शोच्या पडद्यामागील अनेक गोष्टींबाबत भाष्य केले असून, काही गंभीर आरोपही केले आहेत.

2 / 6
नेहलने सांगितले की तिने वादग्रस्त ठरलेल्या House Arrest या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. मात्र शोमधील काही गोष्टींमुळे ती काही दिवसांतच बाहेर पडली. हा शो त्यातील अश्लील आणि वादग्रस्त कंटेंटमुळे चर्चेत आला होता.

3 / 6
मुलाखतीदरम्यान नेहलने दावा केला की शोमधील काही टास्क अतिशय विचित्र स्वरूपाचे होते. एका टास्कमध्ये मुलांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांच्या हातांना बेड्या घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या मुलींना किस करायला सांगितले गेले आणि नंतर कोणत्या मुलीने किस केले हे ओळखण्याचे आव्हान देण्यात आले होते.

4 / 6
याहूनही धक्कादायक दावा करताना नेहल म्हणाली की शोच्या टॉयलेट परिसरातही कॅमेरे बसवण्यात आले होते. निर्मात्यांना नेमके काय पाहायचे होते? असा प्रश्न तिने उपस्थित केला. तिच्या मते, एका पुरुष स्पर्धकाचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ लीक झाल्यानंतर हे कॅमेरे हटवण्यात आले.

5 / 6
नेहलने शो सोडण्यामागचे कारणही स्पष्ट केले. तिच्या म्हणण्यानुसार, एका टास्कमध्ये ती विजेती ठरली होती, मात्र निर्मात्यांनी निकाल बदलून दुसऱ्या स्पर्धकाला विजयी घोषित केले. यावर तिने आक्षेप घेतला आणि आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगितले.

6 / 6
या घटनेनंतर दिग्दर्शकाशी तिचा वाद झाल्याचेही तिने सांगितले. तिच्या मते, दिग्दर्शकाने तिच्यावर आवाज चढवला, त्यानंतर तिनेही आपली भूमिका ठामपणे मांडली. वाद वाढल्यानंतर तिने शो अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us