धक्कादायक! संतप्त आंदोलकांनी थेट संसद पेटवली, तरुणांच्या रोषाने देश हादरला!

Nepal: भारताचा शेजारील देश नेपाळमध्ये मोठा गोधळ सुरु आहे. सरकारने सोशल मीडियावर घातलेली बंदी आणि भ्रष्टाचाराविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. आधी पंतप्रधानांनी राजीनामा दिला त्यानंतर आता आता आंदोलक संसदेत घुसले असून त्यांनी संसदेला आग लावली आहे.

| Updated on: Sep 09, 2025 | 3:26 PM
1 / 5
Nepal नेपाळमध्ये सोमवारी सोशल मीडियावरील बंदी आणि भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन झाले, यावेळी पोलिसांनी गोळीबार केला, ज्यामध्ये 19 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तरुणांचा रोष वाढला आणि आंदोलन आणखी तीव्र झाले.  Parlimeant

2 / 5
आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कर्फ्यू जाहीर केला. मात्र त्यानंतरही हजारो तरुण रस्त्यावर उतरले असून त्यांनी सुरुवातीला अनेक मंत्र्यांची निवासस्थाने जाळली. त्यानंतर या तरुणांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या खाजगी निवासस्थानांवर कब्जा करून त्यांना आग लावली आहे.

3 / 5
संतप्स आंदोलकामनी नेपाळी काँग्रेसचे केंद्रीय कार्यालय पेटवले, त्यानंतर संसद भवनालाही आग लावली आहे. आता संसद जळत आहे. या ठिकाणी परिस्थिती हाताळण्यासाठी कोणीही नाही.

4 / 5
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र तरीरी आंदोलक जाळपोळ करत आहेत. अनेक मंत्र्यांची घरे जाळण्यात आली आहेत.

5 / 5
नेपाळच्या सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.  त्यामुळे सैन्य हेलिकॉप्टरने मंत्र्यांना बाहेर काढत आहे. राजधानी काठमांडूच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणांवरही बंदी घालण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.