Rohit Sharma : सचिन, विराट, धवनला जमलं फक्त रोहित शर्माचं एकटा बाकी आहे, न्यूझीलंड दौरा त्याच्यासाठी शेवटची संधी
Rohit Sharma : भारत न्यूझीलंड विरुद्ध पाच वनडे सामन्यांची सीरीज खेळणार आहे. चार नोव्हेंबरपासून ही सीरीज सुरु होणार आहे. ही सीरीज रोहित शर्मासाठी शेवटची संधी असेल. जाणून घ्या.

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या वनडे टीमची घोषणा झाली आहे. रोहित शर्माची न्यूझीलंड दौऱ्यासाठीच्या टीममध्ये निवड झाली आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे, न्यूझीलंड विरुद्ध होणारी वनडे सीरीज रोहित शर्मासाठी शेवटची संधी आहे. (Photo: PTI)
SENA देशाविरुद्ध ज्या भारतीयांनी शतक झळकवलय त्यात सहभागी होण्याची रोहित शर्माला संधी आहे. आतापर्यंत अशी कमाल फक्त तीन भारतीयांनी केली आहे. सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि शिखर धवन. (Photo: PTI)
SENA देशांचा अर्थ दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया आहे. सचिन, विराट आणि धवन यांनी या चार देशांविरुद्ध वनडे शतक झळकावलं आहे. रोहितला या क्लबमध्ये दाखल होण्यासाठी न्यूझीलंड विरुद्ध शतक झळकावावं लागेल. (Photo: PTI)
रोहित शर्माने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मध्ये वनडे शतक झळकावलं आहे. पण न्यूझीलंडमध्ये त्याच्या नावावर एकही शतक नाहीय. ही पाच वनडे सामन्यांची सीरीज लास्ट चान्स असेल. कारण रोहितच्या करिअरमधील हा शेवटचा न्यूझीलंड दौरा असेल. (Photo: PTI)
भारत आणि न्यूझीलंडमध्ये वनडे सीरीज 4 नोव्हेंबरपासून सुरु होईल. शेवटची वनडे 15 नोव्हेंबरला आहे. रोहित शर्मा न्यूझीलंड विरुद्ध शतक झळकवून SENA देशाविरुद्ध शतक झळकवणारा चौथा भारतीय बनणार की नाही याकडे सर्वांच लक्ष असेल. (Photo: PTI)