8 कोटी बजेटमध्ये 4300 कोटींची कमाई करणारा हॉरर चित्रपट, आता OTT वर येतोय, बघण्यासाठी पाहिजे हिंमत

8 कोटी बजेट असणाऱ्या या चित्रपटाने केलेली 4300 कोटींची कमाई. आता ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. एकट्याने बघण्याचे धाडस करू नका.

| Updated on: Oct 16, 2026 | 2:11 PM
1 / 5
2026 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या हॉरर चित्रपटांपैकी एक असलेला ‘ऑब्सेशन’ आता ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हॅलोविनच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर 30 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता जिओहॉटस्टारच्या पीकॉक हबवर होणार आहे.

2026 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या हॉरर चित्रपटांपैकी एक असलेला ‘ऑब्सेशन’ आता ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हॅलोविनच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर 30 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता जिओहॉटस्टारच्या पीकॉक हबवर होणार आहे.

2 / 5

विशेष म्हणजे, प्रेक्षकांना चित्रपटाची मूळ अनकट आवृत्ती पाहायला मिळणार असून, तो इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असेल. करी बार्कर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या हॉरर चित्रपटात इंडे नवरेट आणि मायकेल जॉनस्टन यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

3 / 5

चित्रपटाच्या थरारक कथेमुळे आणि भयावह दृश्यांमुळे तरुण प्रेक्षकांमध्ये त्याची विशेष चर्चा झाली. ‘ऑब्सेशन’ हा चित्रपट 15 मे 2026 रोजी अमेरिका आणि इतर देशांमध्ये प्रदर्शित झाला होता तर भारतात 29 मे रोजी त्याने चित्रपटगृहांत प्रवेश केला.

4 / 5

कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. आता ओटीटीवरील अनकट आवृत्तीमुळे प्रेक्षकांना चित्रपटाचा संपूर्ण भयावह अनुभव घेता येणार आहे.

5 / 5

चित्रपटाच्या डिजिटल प्रदर्शनाची घोषणा जिओहॉटस्टारच्या सोशल मीडिया पेजवर करण्यात आली. त्यामुळे हॅलोविनच्या काळात हॉरर चित्रपट पाहण्याची आवड असलेल्या प्रेक्षकांसाठी ‘ऑब्सेशन’ हा एक खास पर्याय ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us