मुलीला स्टार बनवण्यासाठी आईनं आयुष्य पणाला लावलं, पण एक निर्णय ठरला जीवघेणा, दोघांचा झाला वेदनादायक मृत्यू, हादरलेला देश

संपूर्ण आयु्ष्य पणाला लावून या आईनं मुलीला बनवलं होतं स्टार. पण 1 निर्णयाने सर्व काही बर्बाद झालं. दोघांचाही झाला वेदनादायक मृत्यू. हादरलेला देश.

| Updated on: May 28, 2026 | 6:46 PM
1 / 6
80 च्या दशकात दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री राणी पद्मिनी हिची कहाणी आजही अंगावर काटा आणणारी मानली जाते.

2 / 6
1981 मध्ये राणी पद्मिनी यांनी मलयाळम चित्रपट ‘कथायरियाते’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांमधील तब्बल 60 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं.

3 / 6
यश आणि प्रसिद्धीसोबतच राणी पद्मिनी यांची आर्थिक परिस्थितीही मजबूत झाली. त्यांनी चेन्नईतील अण्णा नगर परिसरात एक आलिशान बंगला भाड्याने घेतला आणि त्या आपल्या आईसोबत तिथे राहत होत्या. घराची देखभाल करण्यासाठी त्यांनी जाहिरात देऊन तीन नोकर ठेवले होते. ड्रायव्हर जेबराज, वॉचमन कुट्टी आणि स्वयंपाकी गणेशन. मात्र, हाच निर्णय त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली.

4 / 6
मिळालेल्या माहितीनुसार, राणी पद्मिनी यांनी तो बंगला रोख रकमेत खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही बाब त्यांच्या ड्रायव्हरच्या कानावर पडली. घरात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि दागिने असल्याचा अंदाज आल्यावर त्या तिघांनी चोरी आणि हत्येचा कट रचला.

5 / 6
15 ऑक्टोबर 1986 रोजी सकाळी घरात इतर कोणी नसताना तिघांनी प्रथम राणी पद्मिनी यांच्या आई इंदिराकुमारी यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली. आईच्या आरडाओरड्याचा आवाज ऐकून राणी पद्मिनी धावत आल्या. मात्र, आरोपींनी त्यांनाही पकडून अत्यंत क्रूरपणे ठार मारलं. त्यानंतर घरातील रोख रक्कम आणि दागिने घेऊन तिघे फरार झाले.

6 / 6
या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तिन्ही आरोपींना अटक केली. न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एका आईने आपल्या मुलीला स्टार बनवण्यासाठी संपूर्ण आयुष्य झोकून दिलं. दोघींनी संघर्ष केला, यश मिळवलं, प्रसिद्धी अनुभवली आणि दुर्दैवाने एकाच घरात, एकाच दिवशी दोघींनाही मृत्यूला सामोरं जावं लागलं.

Follow Us